Human Heart Self Healing | मानवी हृदयात असते स्वतःला ठीक करण्याची नैसर्गिक क्षमता

Human Heart Self Healing
Human Heart Self Healing | मानवी हृदयात असते स्वतःला ठीक करण्याची नैसर्गिक क्षमता
Published on
Updated on

नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्रातील एका क्रांतिकारी संशोधनात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, मानवी हृदयामध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची नैसर्गिक क्षमता असते. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, हार्ट अटॅकनंतर हृदयामध्ये नवीन ‘मसल सेल्स’ (स्नायू पेशी) तयार होतात, याचाच अर्थ हृदय काही प्रमाणात स्वतःची डागडुजी करू शकते.

जेव्हा हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो, तेव्हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयाच्या पेशी मरू लागतात. आतापर्यंत असे मानले जात होते की, या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शरीर केवळ ‘स्कार टिशू’ (एक प्रकारचा कडक डाग) तयार करते. हे स्कार टिशू हृदयाच्या सामान्य स्नायूंप्रमाणे लवचिक नसतात. त्यामुळे हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते आणि भविष्यात ‘हार्ट फेलियर’चा धोका वाढतो. कार्डियोलॉजिस्ट डॉ. रॉबर्ट ह्यूम आणि त्यांच्या टीमला या संशोधनात असे आढळले की, मानवी हृदय केवळ स्कार टिशूच बनवत नाही, तर नवीन स्नायू पेशीही निर्माण करते.

ही प्रक्रिया हृदयाला पुन्हा कार्यक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शास्त्रज्ञांनी यापूर्वी उंदीर आणि काही विशिष्ट प्राण्यांमध्ये ही क्षमता पाहिली होती. उंदराचे हृदय दुखापत झाल्यानंतर स्वतःला पूर्णपणे रिपेअर करू शकते. मात्र, मानवामध्ये अशी क्षमता नसते, असा आजवरचा समज होता. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या या संशोधनाने हा समज आता खोडून काढला आहे. हृदयाच्या या अद्भुत क्षमतेचा शोध लागल्यामुळे भविष्यात हृदयविकारावर उपचार करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होऊ शकतात. जर शास्त्रज्ञांनी या नैसर्गिक ‘सेल्फ-रिपेअर’ प्रक्रियेला अधिक वेग देण्याचे तंत्र विकसित केले, तर हार्ट अटॅकनंतर रुग्णांचे प्राण वाचवणे आणि त्यांचे हृदय पुन्हा पूर्णपणे निरोगी करणे सोपे होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news