

लंडन : आपल्या सौरमंडळाचा केंद्रबिंदू सूर्य हा आपल्या सौरमंडळाच्या केंद्रस्थानी असलेला एक तारा आहे. तो सौरमंडळातील सर्वात मोठा, तेजस्वी आणि प्रचंड वस्तुमान असलेला घटक आहे. पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक प्रकाश आणि उष्णता तो देतो. ‘न्युक्लिअर फ्यूजन’ नावाच्या प्रक्रियेद्वारे तो 27 दशलक्ष अंश फॅरेनहाईट (15 दशलक्ष अंश सेल्सियस) पेक्षा जास्त उष्ण होऊ शकतो. सुमारे 4 अब्ज वर्षांपासून सूर्य अस्तित्वात आहे; पण एक दिवस त्याचे इंधन संपेल, म्हणजेच त्याचाही मृत्यू होईल!
सूर्य हा वायू आणि प्लाझ्माचा गोळा आहे, जो बहुतांशी हायड्रोजनने बनलेला आहे. सूर्य या हायड्रोजनच्या साठ्याचा उपयोग आपल्या पृथ्वीला उष्णता आणि प्रकाश देण्यासाठी करतो. ‘न्युक्लिअर फ्यूजन’ मध्ये दोन हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियम नावाचा पदार्थ तयार होतो. सूर्यामध्ये तीन चतुर्थांश हायड्रोजन आणि एक चतुर्थांश ‘हेलियम’ आहे, तसेच काही प्रमाणात धातू आहेत. जसा तारा मोठा असतो, तसा तो हायड्रोजन लवकर संपवतो. काही मोठे तारे, ज्यांचे वस्तुमान सूर्याच्या 40 पट जास्त आहे, ते फक्त 10 लाख वर्षे जगतात. याउलट, सूर्याचे आयुष्य सुमारे 10 अब्ज वर्षे असेल.
सूर्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तापमान वेगवेगळे असते. सूर्याचा गाभा 27 दशलक्ष अंश फॅरेनहाईट (15 दशलक्ष अंश सेल्सियस) पर्यंत उष्ण असतो. पृथ्वीवरून आपण सूर्याचा जो भाग पाहतो, त्याला ‘फोटोस्फियर’ म्हणतात. त्याचे तापमान सुमारे 9,900 अंश फॅरेनहाईट (5,500 अंश सेल्सियस) असते. फोटोस्फियरच्या वर सूर्याचे बाह्य वातावरण आहे, ज्याला कोरोना म्हणतात. पृथ्वीवरून आपण कोरोना सामान्य स्थितीत पाहू शकत नाही; परंतु ग्रहणाच्या वेळी त्याचे फोटो काढता येतात. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली. त्या वेळी, आकाशगंगेचा जो भाग सौरमंडल बनणार होता, तो वायूंच्या दाट ढगांनी भरलेला होता. या ढगांमधील सर्वात सघन भाग कोसळला आणि ‘प्रोटोस्टार’ नावाचा बीजरूपातील तारा तयार झाला, जो पुढे सूर्य बनला.
हार‘प्रोटोस्टार’ जसा मोठा झाला, तसे ग्रह, उपग्रह आणि लघुग्रह तयार झाले आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या कक्षेत फिरू लागले. सूर्याच्या केंद्रस्थानी ‘न्युक्लियर फ्युजन’ मुळे उष्णता आणि प्रकाश निर्माण झाला, ज्यामुळे पृथ्वीवर जीवनाचा विकास झाला. पण, ‘न्युक्लियर फ्यूजन’ मुळे सूर्याचे इंधन संपेल आणि त्याचा अंत होईल. सूर्य त्याच्या आयुष्याच्या मध्यावर आहे. ‘न्युक्लियर फ्यूजन’ चा बाहेरील दाब आणि गुरुत्वाकर्षणाचा आतील दाब यांच्यात सतत लढाई चालू आहे. जेव्हा 5 अब्ज वर्षांनी सूर्यातील हायड्रोजन संपेल, तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा दाब जिंकेल. त्यानंतर सूर्याचा केंद्रभाग आकुंचित होऊन घनदाट कोअरमध्ये रूपांतरित होईल. हेलियम कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजनसारख्या dense elements मध्ये fuse व्हायला सुरुवात होईल.
यामुळे सूर्याच्या बाहेरील भागावर दाब येईल आणि तो फुगण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे पृथ्वीसह सौरमंडळातील ग्रहांना धोका निर्माण होईल. सूर्य ‘रेड जायंट’ नावाचा तारा बनेल आणि त्याचा बाहेरील भाग मंगळाच्या कक्षेपर्यंत पसरेल, ज्यामुळे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह गिळले जातील; पण या टप्प्यामध्ये सूर्याचा अंत होणार नाही. यामध्ये फुगलेला बाहेरील भाग ‘प्लॅनेटरी नेब्युला’ नावाचे ‘गॅस शेल’ तयार करेल. सुमारे 1 अब्ज वर्षांनंतर हे वायूचे कवच गळून जाईल आणि सूर्याचा ‘स्मोल्डरिंग कोअर’ उघडा पडेल, जो ‘व्हाईट ड्वॉर्फ’ नावाचा dense ball असेल. ‘व्हाईट ड्वॉर्फ’ बनल्यानंतर सूर्य हळू हळू मंद होत जाईल. ‘प्लॅनेटरी नेब्युला’ मधील सामग्री आकाशगंगेत पसरून जाईल आणि पुढील पिढीतील तारे आणि ग्रहांचे पायाभूत घटक तयार करेल.