Bermuda Island | बर्म्युडा बेट कसे तयार झाले?

Bermuda Island |
Bermuda Island | बर्म्युडा बेट कसे तयार झाले?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अटलांटिक महासागराच्या मध्यभागी असलेले ‘बर्म्युडा बेट’ नेहमीच वैज्ञानिकांसाठी एक मोठे कोडे राहिले आहे. सहसा बेटे ही समुद्रातील डोंगररांगांवर किंवा ज्वालामुखीवर वसलेली असतात. मात्र, बर्म्युडा याला अपवाद आहे. महासागराच्या मध्यभागी हे बेट आले कुठून? याचा शोध आता झिंक आणि कार्बनच्या सहाय्याने केलेल्या एका विशेष संशोधनातून लागला आहे.

पृथ्वीच्या पोटातील कार्बन हा दगड वितळवून लाव्हा बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. वैज्ञानिकांनी या संशोधनात ‘झिंक’चा वापर एखाद्या गुप्तहेरासारखा केला. जर बर्म्युडाचा लाव्हा समुद्राच्या तळाशी असलेल्या जुन्या चुनखडीपासून बनला असता, तर त्यातील झिंकची पातळी वेगळी असती. मात्र, लाव्हा नमुन्यांच्या तपासणीत झिंकची पातळी सामान्य आढळली, ज्यामुळे जुन्या सिद्धांतांना छेद मिळाला आहे. वैज्ञानिकांनी लाव्हामधील कार्बन डायऑक्साईडसह शिसे आणि स्ट्रॉन्शिअमसारख्या धातूंची बारीक तपासणी केली.

हे धातू या खडकांसाठी एखाद्या ‘मेमरी कार्ड’ सारखे काम करतात, ज्यातून त्या खडकाचा इतिहास समजतो. यावरून असे सिद्ध झाले की, बरमुडाची निर्मिती समुद्राच्या तळातील साध्या मातीपासून झालेली नाही. संशोधनानुसार, बर्म्युडाच्या निर्मितीची कथा कोट्यवधी वर्षांपूर्वीची आहे : महाखंडांचे विलीनीकरण : जेव्हा पृथ्वीवरील सर्व खंड एकत्र जोडलेले होते, तेव्हा समुद्राच्या काही मोठ्या प्लेटस् पृथ्वीच्या आत गाडल्या गेल्या होत्या. कार्बनची जादू : खडकांना वितळवण्यासाठी प्रचंड उष्णतेची गरज असते.

मात्र, बरमुडाच्या खाली असलेल्या कार्बनने खडकांचा द्रवणांक कमी केला. कमी उष्णतेत लाव्हा : यामुळे कमी उष्णतेतही खडक वितळले आणि लाव्हा तयार झाला. कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या प्लेटस्मध्ये झालेल्या किरकोळ हालचालीमुळे हा लाव्हा वर आला आणि त्यातून बरमुडा बेटाचा जन्म झाला. झिंकच्या मदतीने हे स्पष्ट झाले आहे की, बर्म्युडाचा लाव्हा नैसर्गिक प्रक्रियेतून वर येताना बदलत गेला. हे बेट म्हणजे कोणतीही अपघाती घटना नसून, महाद्वीप जेव्हा एकत्र होते तेव्हा सुरू झालेल्या भूगर्भीय हालचालींचा हा परिणाम आहे. या संशोधनामुळे आता अटलांटिक महासागराच्या भूगर्भीय इतिहासाकडे पाहण्याचा नवा द़ृष्टिकोन मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news