Stroke Prevention After 40 | चाळिशीनंतर पक्षाघाताचा धोका टाळायचा आहे? तर मग हे करा

Stroke Prevention After 40 |
Stroke Prevention After 40 | चाळिशीनंतर पक्षाघाताचा धोका टाळायचा आहे? तर मग हे करा
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वयाच्या चाळिशीनंतर पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली महत्त्वाच्या ठरतात. चालणे, स्नायू बळकट करणारा व्यायाम आणि योगासने या तिन्हींचा योग्य समन्वय आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे न्यूरोलॉजिस्टनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, दररोज ३० मिनिटे वेगाने चालणे आठवड्यातून पाच दिवस केल्यास जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेले १५० मिनिटांचे मध्यम स्वरूपातील व्यायामाचे उद्दिष्ट पूर्ण होते.

यामुळे रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.आठवड्यातून दोन दिवस वजन किंवा रेसिस्टन्स बँडच्या साहाय्याने स्नायू बळकट करणारा व्यायाम करावा. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये स्नायू आणि हाडांची झीज वेगाने होत असल्याने हा व्यायाम महत्त्वाचा ठरतो. योगासनांमुळे ताण कमी होण्यास आणि लवचीकता वाढण्यास मदत होते. योगामुळे रक्तदाबातही मर्यादित घट दिसली आहे. मात्र, योग हा चालण्याला पूरक असावा. केवळ व्यायाम पुरेसा नाही. नियमित रक्तदाब व साखर तपासणी, मिठाचे प्रमाण कमी करणे आणि तंबाखू टाळणेही आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.