सणासुदीचे दिवस असोत किंवा एरवीही घराची साफसफाई करीत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हल्ली अनेक अद्ययावत उपकरणे घरोघरी आलेली आहेत. त्यामध्येच स्मार्ट टीव्हीचाही समावेश होतो. स्मार्ट टीव्ही स्वच्छ करणे खूप सोपे आहे. परंतु जर आपण ते योग्य प्रकारे केले नाही तर ते खराब देखील होऊ शकते. स्मार्ट टीव्ही कसा स्वच्छ करावा याची ही माहिती...
कधीही पाण्याची फवारणी करू नका - पाणी स्क्रीनच्या आतील भागात घुसू शकते आणि टीव्हीचे नुकसान करू शकते.
हार्ड ब-श वापरू नका - हे स्क्रीन स्क्रॅच करू शकतात आणि त्याची चमक कमी करू शकतात.
हे कपडे वापरू नका - टीव्ही पुसण्यासाठी कधीही कागदी टॉवेल किंवा इतर रुक्ष कपडे वापरू नका. हे स्क्रीन स्क्रॅच देखील करू शकतात.
रसायनांचा वापर करू नका - टीव्ही स्क्रीनवर कोणतेही केमिकल्स वापरू नका. हे पदार्थ स्क्रीन खराब करू शकतात.
टीव्ही बंद करा आणि प्लग काढा - नेहमी टीव्ही बंद करा आणि साफ करण्यापूर्वी प्लग काढून टाका. यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा धोका टाळू शकता.
मऊ कापड वापरा - स्मार्ट टीव्हीची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी नेहमी मऊ, कोरडे मायक्रोफायबर कापड वापरा.
हलक्या हातांनी स्वच्छ करा - स्मार्ट टीव्हीची स्क्रीन जास्त जोरात चोळू नका. हलक्या हातानेच स्वच्छ करा.
धूळ काढण्यासाठी एअर ब्लोअरचा वापर करा - टीव्हीच्या बाजूला आणि पोर्टमध्ये साचलेली धूळ काढण्यासाठी तुम्ही एअर ब्लोअरचा वापर करू शकता.