

नवी दिल्ली : लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या गर्भात चालू झालेल्या एका अलौकिक भूशास्त्रीय प्रक्रियेची फलश्रुती म्हणजे नैसर्गिक हिरे. नैसर्गिक हिरे हे दुर्मीळ असतात आणि हळूहळू ते अधिकाधिक दुर्मीळ बनत चालले आहेN. हिरे सापडण्याचं प्रमाण 2005 पासून 30 टक्के घटलं आहे आणि अलीकडे लक्षणीय म्हणावा असा हिर्यांचा साठा सापडलेला नाही. नैसर्गिक हिरे हे कालातीत आहेत. ते बनण्याची प्रक्रिया तब्बल 9 कोटी ते 350 कोटी वर्षे इतकी प्रदीर्घ आहे, तर दुसरीकडे आपल्या पृथ्वीचं वय 454 कोटी वर्षांचं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 90 ते 150 मैल आत दडलेल्या या हिर्यांनी पाहिलेल्या काळाची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. जेव्हा तुम्ही एखादा हिरा हातात घेता तेव्हा एक अतिप्राचीन गोष्ट आपल्याला गवसली आहे, असं बिनदिक्कत म्हणू शकता.
प्रत्येक हिरा हा एकमेवाद्वितीय असतो. खाणीतून निघणार्या प्रत्येक एक लाख हिर्यांपैकी एखादाच हिरा साधारण एक कॅरेटपेक्षा जास्त भरतो आणि एखाद्या अप्रतिम दागिन्यामध्ये आवश्यक असणारी सुस्पष्टता त्यात असते. त्यामुळे हिरा लाखात एकच असतो! 2,0000 फॅ. एवढं तीव्र तापमान आणि 7,25,00 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा प्रचंड दाब सहन केल्यानंतर कार्बनच्या अणूंचं स्फटिकीभवन होऊन ते नैसर्गिक हिर्यांमध्ये रूपांतरित होतात. निसर्गाच्या कठीण परीक्षेतून तावून सुलाखून निर्माण होणारा एक अप्रतिम आविष्कार. आत्यंतिक उष्णता, दाब सहन करत, सापडले जाण्याची शक्यता गृहित धरत, ज्वालामुखीच्या उद्रेकातून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचणारे हिरे हे खर्या अर्थाने दुर्मीळ असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास हा निव्वळ शक्यतांचा खेळ असतो. कारण आतापर्यंत केवळ 1 टक्के ज्वालामुखी उद्रेकांमध्येच घडवता येण्याजोगे हिरे सापडले आहेत.