पृथ्वीचे वजन किती आहे, ते कसे मोजतात?

पृथ्वीचे वजन नेमकं आहे तरी किती?
How much does the earth really weight?
पृथ्वीचे वजन नेमकं आहे तरी किती?Pudhari Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः बह्मांडात अनेक ग्रह अस्तित्वात आहेत. यापैकी फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी अस्तित्वात आहे, असे सध्यातरी दिसून येते. पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली यासह अनेक रहस्यांचा नेमका व स्पष्ट उलगडा झालेला नाही. अशातच आणखी एक प्रश्न आहे ज्याच्या उत्तरावरून संशोधकांमध्ये नेहमीच वादविवाद होत राहतात ते म्हणजे पृथ्वीचे वजन. जाणून घेऊया, पृथ्वीचे वजन नेमकं आहे तरी किती?

How much does the earth really weight?
पृथ्वीचे भवितव्य जाणून घेणारा महासंगणक

पृथ्वीवर कोट्यवधी जीव अस्तित्वात आहेत. यासह आकाशाचे टोक गाठणारे उत्तुंग पर्वत तसेच अथांग समुद्रकिनारे, झाडे- झुडपे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहेत. पृथ्वीवर वातावरणाचा देखील भार आहे. पृथ्वीचे वजन 13,170,000,000,000,000,000,000,000 पौंड इतके आहे. अधिक स्पष्ट सांगायचे झाले तर 5.97221024 अर्थात 5,974,000,000,000,000,000,000,000 किलोग्रॅम इतके आहे. अर्थात, पृथ्वीचे वजन कमी- जास्त होत आहे. पृथ्वीच्या वातावरणात असणारा हवेचा दाब तसेच पृथ्वीवर असणारे व पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षातून वातावरणात येणारे वायूकण, धूलीकण यामुळे वजन सातत्याने कमी- जास्त होत आहे.

How much does the earth really weight?
Earth and Moon : चंद्र नसता तर पृथ्वीचे काय झाले असते..?

पृथ्वीवर अनेक गोष्टी या निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मित आहेत. यामुळे पृथ्वीचे वजन कायम स्थिर राहू शकत नाही. गुरुत्वाकर्षण बल दोन भिन्न वस्तूंमध्येही असते. हेच सूत्र वापरून दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण शक्ती मोजून पृथ्वीचे वजन काढण्यात आले. संशोधकांनी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या मदतीने पृथ्वीचे वजन केले. यासाठी न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांताची मदत घेण्यात आली. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्स अँड टेक्नॉलॉजीचे मेट्रोलॉजिस्ट स्टीफन स्लेमिंगर यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news