

लंडन : तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते, तेव्हा तिचे शरीरच तिला धोका देऊ शकते? 18 जानेवारी 1951 हा दिवस इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण, याच दिवशी नेदरलँडस्मध्ये पहिल्यांदा ‘लाय डिटेक्टर टेस्ट’चा वापर करण्यात आला होता. माणसाच्या हृदयाचे ठोके आणि श्वासाची गती मोजून खरे-खोटे ओळखणाऱ्या या तंत्रज्ञानाचा प्रवास अतिशय रंजक आहे.
लाय डिटेक्टरचा पहिला मोठा वापर 1951 मध्ये झाला असला, तरी या तंत्रज्ञानाचा शोध त्याच्या सुमारे 30 वर्षे आधीच लागला होता. 1921 मध्ये जॉन ऑगस्टस लार्सन यांनी हे उपकरण बनवले होते. लार्सन यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शास्त्रज्ञ असण्यासोबतच एक पोलिस अधिकारीही होते. प्रश्नांची उत्तरे देताना मानवी शरीरात होणारे बदल रेकॉर्ड करू शकेल असे यंत्र त्यांनी विकसित केले. लाय डिटेक्टरला तांत्रिक भाषेत ‘पॉलीग््रााफ’ असेही म्हणतात. हे यंत्र थेट ‘खरे’ की ‘खोटे’ असे सांगत नाही, तर ते फक्त तुमच्या शरीरातील संकेतांचे मापन करते.
चाचणी दरम्यान हे यंत्र पुढील गोष्टींची नोंद ठेवते : हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वसनाचा वेग आणि त्वचेचा ओलावा (घाम येणे). जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते, तेव्हा तिच्यावर मानसिक ताण येतो. या दबावामुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये बदल होतात आणि हेच बदल मशिन पकडते. तपासणीच्या वेळी व्यक्तीला विविध सेन्सर्सद्वारे मशिनशी जोडले जाते. सुरुवातीला नाव, पत्ता यांसारखे सामान्य प्रश्न विचारले जातात. त्यानंतर हळूहळू मूळ प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यंत्र शरीराच्या प्रतिक्रियांचा एक आलेख (ग््रााफ) तयार करते. जर एखाद्या विशिष्ट प्रश्नावर शरीराच्या प्रतिक्रियेत किंवा ग््रााफमध्ये अचानक बदल दिसला, तर तज्ज्ञांना त्या व्यक्तीच्या उत्तरावर संशय येतो. अनेक देशांमध्ये ‘पॉलीग््रााफ टेस्ट’चा निकाल न्यायालयात अंतिम पुरावा म्हणून ग््रााह्य धरला जात नाही. कारण, काही लोक मानसिक सरावाने या चाचणीला चकवू शकतात, असाही एक मतप्रवाह आहे.