

टोरांटो : कधी कधी निसर्ग अशा काही गोष्टी घडवतो ज्यावर विश्वास ठेवणं अशक्य वाटतं. असंच काहीसे कॅनडामध्ये घडले. येथे एका मुलीला असा बेडूक दिसला ज्याचे डोळे बाह्यबाजूला डोक्यावर नाही तर त्याच्या तोंडात होते. पहिल्यांचा हा प्रकार विचित्र वाटेल, मात्र ही अफवा नाही तर वैज्ञानिकद़ृष्ट्या सत्य आहे.
कॅनडाच्या ओंटारिया भागात बर्लिंगटनमध्ये राहणारी एका शालेय विद्यार्थिनी डिड्रे आपल्या अंगणात खेळत होती. तेव्हा एक विचित्र बेडूक दिसला. तो डोळे बंद करून बसलेला होता. त्याने तोंड उघडताच डिड्रे जोरात ओरडली. त्याच्या तोंडात दोन चमकणारे डोळे दिसत होते. डिड्रेला वाटतं त्याने दुसरा एखादा जीव गिळला असेल; मात्र लक्ष देऊन पाहिलं तर ते डोळे बेडकाचे स्वत:चेच होते. डिड्रेने या बेडकाचं नाव लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या पात्रावरून गोलमचं नाव दिलं. गोलम अंधारात राहत होता. तिने या बेडकाचे फोटो काढले आणि स्थानिक वृत्तपत्र Hamilton Spectator ला पाठवले.
वृत्तपत्राचा फोटोग्राफर स्कॉर्ट गार्डनरला आधी ही मस्करी वाटली; मात्र त्याने नीट पाहिलं तेव्हा तोही हैराण झाला. यानंतर हा बेडूक देशभरात प्रसिद्ध झाला. शास्त्रज्ञांच्या मते, हे एक आनुवंशिक म्युटेशन आहे. म्हणजेच गर्भाच्या विकासादरम्यान होणारा अडथळा. सामान्यतः बेडकाचे डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला विकसित होतात; परंतु या प्रकरणात जनुकाची दिशा उलट झाली. टोरंटो विद्यापीठाचे प्राध्यापक जेम्स बोगर्ट यांच्या मते, ‘गोलम’चे डोळे मागे सरकले आणि तोंडाच्या आत विकसित झाले. हे मॅक्रोम्युटेशनचे प्रकरण आहे, जे खूप दुर्मीळ आहे. रासायनिक प्रदूषण किंवा पर्यावरणीय परिणामांची भूमिका यात महत्त्वाची असण्याची शक्यता आहे.