सापांची झोप कशी असते?

साप हे शीत रक्ताचे प्राणी आहेत
How do snakes sleep?
सापांची झोप कशी असते?Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : साप हे शीत रक्ताचे प्राणी आहेत. त्यांना शरीरातील उष्णतेसाठी वातावरणामध्ये असलेल्या उष्णतेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात त्यांना आपल्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी अनेक उपाय करावे लागतात. त्यामध्येच त्यांच्या झोपेचाही समावेश होतो. सापांच्या झोपेचा विचार केला तर ते 24 तासांपैकी 16 तास झोपतात. सुस्त अजगराचा झोपण्याचा कालावधी प्रदीर्घ असतो. आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळणारा विशालकाय अजगर 18 तासांची मस्त झोप काढत असतो.

जे साप रात्रीचे सक्रिय असतात ते दिवसा झोपा काढतात, तर दिवसा सक्रिय असणारे साप रात्री झोपतात. हिवाळ्यात मात्र साप कुंभकर्णी झोप काढतात. साप थंडीत हायबरनेशनमध्ये जातात. ते या दरम्यान अनेक आठवडे ते महिने झोपतात. त्यांना शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अशी शीतकालीन झोप उपयुक्त ठरते. थंडीत बहुतांश साप बिळात झोपतात. यावेळी ते जास्त काळ झोपतात. थंडीत साप 20 ते 22 तास झोपा काढतात. विशाल अजगर थंडीत एकावेळी शिकार केल्यानंतर अनेक दिवस झोपून असतो. आपली झोप अनेक टप्प्याची असते. जशी हलकी झोप, गाढ झोप आणि अधुरी झोप. अशावेळी झोपेत आपण स्वप्नं पाहतो. परंतु, सापांची झोप वेगळी असते. शीतकालीन निद्रावस्थेत सापांचे शरीर जवळजवळ निष्क्रीय होते. त्यांच्या हृदयाची गती धीमी होते. ते श्वासही एकदम हळूहळू घेतात. त्यावेळी ते झोपलेत की मेलेत हेदेखील समजत नाही! थंडीत सापांचे शरीर गार पडते. त्यावेळी त्यांना अन्न शोधण्यासाठी शिकार करणे आणि भक्ष्य शोधणे अवघड बनते. यामुळे ते शीतनिद्रावस्थेत पोहोचतात. त्यावेळी शरीरात आधीच साठलेल्या चरबीचा ते अन्नासाठी वापर करतात. ही चरबी त्यांना जगवते. काही साप तर आठ महिने शीतकालीन निद्रेत असतात. त्याच्या शीतनिद्रेचा काळ हा त्याची प्रजाती आणि वातावरणावर अवलंबून असतो. शीतकालीन निद्रेत त्यांचे वजनदेखील घटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news