कर्करोगाच्या पेशी रोगप्रतिकारक शक्तीला ‘कसा’ देतात चकवा?

‘नेचर’ या विज्ञान नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती
Cancer Cells
जाणून घ्या नक्की आहे तरी कायPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली ः कर्करोगाच्या पेशी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला आपल्या ‘लिपिड’ म्हणजेच बाह्य आवरणातील फॅटी कम्पांडच्या सहाय्याने चकवा देऊन लपून राहू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. या पेशी कधी कधी असा छुपा मार्गही पत्करतात. सहसा अशा पेशींच्या मेम्बेनवर म्हणजेच आवरणावर काही विशिष्ट रसायने निर्माण झाल्याने त्याची माहिती रोगप्रतिकारक यंत्रणेला समजत असते. त्यामुळे या पेशी शरीराची हानी करण्यापूर्वीच त्या नष्टही केल्या जात असतात; मात्र कधी कधी आपले स्वरूप असे उघड न करता या पेशी लपूनही राहू शकतात असे नव्या संशोधनात आढळून आले आहे.

Cancer Cells
जाणून घ्या स्तनाचा कर्करोग

‘नेचर’ या विज्ञान नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या रॉकफेलर युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी आणि सध्या ‘लाईम थेरॅपिटिक्स’मधील संशोधक मॅरिलुझ सौला यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ट्युमर विकसित होण्यामागील ‘इंधना’चा स्रोत म्हणून संशोधक ‘लिपिड’कडेच पाहत असतात; मात्र आता या नव्या संशोधनानुसार लिपिडचा एक विशिष्ट प्रकार आढळला आहे जो प्रतिकारक यंत्रणेपासून लपून राहूनच कर्करोगाच्या पेशींचा फैलाव करतो.

Cancer Cells
Blood Cancer : रक्ताच्या कर्करोग रुग्णसंख्येत वाढ

कॅन्सर बायोलॉजीमध्ये आणि पर्यायाने कर्करोगावरील प्रभावी उपचार शोधण्यातही ‘लिपिड’ हे मेदयुक्त संयुगच महत्त्वाचे ठरते, असे यापूर्वीही संशोधकांना वाटत होते. मॅरिलुझ सौला यांनी सांगितले की सामान्य कर्करोग पेशी स्वतःच ‘मला खा’ अशा पद्धतीचे संकेत रोगप्रतिकारक यंत्रणेला देतात, पण आता या पेशींनी स्वतःमध्ये सुरक्षात्मक बदलही केलेले दिसतात. कर्करोगाच्या वाढीतील लिपिडची भूमिका यामुळे वेगळे चित्र निर्माण करते. अर्थात कर्करोगाच्या पेशी लिपिड मेटाबॉलिझममध्ये बदल घडवतात हे यापूर्वीही माहिती होते. अशा बदलामुळेच सामान्य, निरोगी पेशींच्या तुलनेत या पेशींची बेसुमार वाढ होते व ट्युमर विकसित होतो. या पेशींच्या लिपिडमधील मेद रेणूंचा साठा वाढला जात असतो व त्यामुळे ट्युमरची वाढ होते. कोणत्या प्रकारच्या लिपिडशिवाय कर्करोग राहू शकत नाही याचाही संशोधकांनी शोध घेतला होता व ‘स्फिंगोलिपिड’ हे त्याचे उत्तर मिळाले होते. जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान लुडविग विल्हेम यांनी सन 1800 च्या दशकात त्याचा शोध घेतला होता. लिपिड केवळ इंधनाचे काम करीत नाहीत तर ते कर्करोगाच्या पेशींसाठी संरक्षणात्मक यंत्रणेचेही काम करतात. आता भविष्यातील संशोधनामध्ये हे सर्वच प्रकारच्या कर्करोगामध्ये घडते का हे पहावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news