‘मोमोज’ हे नाव खाद्यपदार्थाला कसे मिळाले?

‘मोमोज’ हे नाव खाद्यपदार्थाला कसे मिळाले?
File Photo
Published on
Updated on

बीजिंग : सध्या परदेशातून आलेले अनेक पदार्थ आपल्या आहारात रुळले आहेत. त्यामध्येच मोमोजचाही समावेश होतो. आपल्या मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ. फक्त आतील सारण वेगळे! अनेकांना वाटतं की मोमोज फक्त आशियाई देशांमध्ये प्रसिद्ध आहेत; पण खरं तर हे जगभर लोकप्रिय झाले आहेत. आजकाल ओपन मोमोज आणि वेगवेगळ्या चवीचे मोमोजही बाजारात मिळतात, जसे की चॉकलेट मोमोज, चीज मोमोज, आणि मसालेदार तंदुरी मोमोज; तर मग मोमोजशी संबंधित काही रंजक माहिती जाणून घेऊया.

मोमोज हा खाद्यपदार्थ भारतात तिबेटमधून आलेला आहे; पण तुम्हाला माहीत आहे का, ‘मोमो’ हा शब्द कुठून आला? हा शब्द तिबेटियन भाषेतील ‘मॉग-मॉग’ (चेस- चेस) वरून घेतला आहे, ज्याचा अर्थ ‘स्टफ्ड बन’ म्हणजेच आतून भरलेला ब्रेड असा होतो. तसेच, नेपाळी भाषेत ‘चेाश’ (मोम) चा अर्थ ‘वाफेवर शिजवलेले पदार्थ’ असा होतो. मोमोज आता केवळ तिबेट किंवा नेपाळपुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण भारतात आणि जगभर लोकप्रिय झाले आहेत. स्ट्रीट फूड मार्केटमध्ये मोमोजच्या वेगवेगळ्या व्हरायटी दिसत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला मोमोज आवडत असतील, तर तुम्ही त्यांचे वेगवेगळे प्रकार नक्की चाखून बघा. हे जाणून काही लोकांना आनंद होईल, तर काहींना थोडा धक्का बसेल. एका मोमोमध्ये सुमारे 35.2 एवढी कॅलरी असतो. म्हणजेच जर तुम्ही एकावेळी 7-8 मोमोज खाल्ले, तर 250-300 कॅलरी तुमच्या शरीरात जाते. जर ते फ्राय केलेले असतील, तर त्यातील कॅलरीज 500 च्या वर जातात.

मोमोजचे अनेक प्रकार आणि आकार असतात. हाफ मून शेप : हा आकार करंज्यासारखा दिसतो. सर्क्युलर मोमो : पूर्ण गोलसर असतो. ओपन मोमो : यात सारण वरून दिसतं आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात पदार्थ भरू शकता. मोमोज हे स्वादिष्ट असले, तरी रोज त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. मोमोजमध्ये मोनो-सोडियम-ग्लूटामेट ( चडॠ) नावाचा पदार्थ असतो, जो जास्त प्रमाणात खाल्ल्यास लठ्ठपणा वाढतो. नर्व्हस डिसऑर्डर, छातीत दुखणे, घाम येणे, आणि हृदयाची धडधड वाढणे यांसारख्या समस्यादेखील उद्भवतात. स्टीम मोमोज- वाफेवर शिजवलेले, हे तुलनेने कमी तेलकट असतात. फ्रायड मोमोज- तेलात तळलेले, अधिक कुरकुरीत पण जास्त कॅलरीयुक्त. पॅन-फ्रायीड- मोमोज हलकं तळलेले, आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत. तंदुरी मोमोज- तंदूरमध्ये शिजवलेले मोमोज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news