Bees Hive Building | मधमाश्या खडबडीत पृष्ठभागावर कसे बांधतात पोळे?

, , , bee behavior research, honeycomb formation, bee nest rough texture,,
how-bees-build-hives-on-rough-surfaces
Bees Hive Building | मधमाश्या खडबडीत पृष्ठभागावर कसे बांधतात पोळे?Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : सामूहिक कौशल्य व मेहनतीचे तसेच उत्कृष्ट सहजीवनाचे उदाहरण आपल्याला मुंग्या आणि मधमाश्या यांच्यामधून पाहायला मिळत असते. मधमाश्या त्यांच्या अनोख्या आणि कार्यक्षम पोळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, अनियमित पृष्ठभागांवरही मधमाश्या आपले पोळे (हनीकॉम्ब) बांधणी कौशल्याने करतात. कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधकांनी यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या या सामूहिक बांधकाम पद्धतीतून 3 D प्रिंटिंगसारख्या तंत्रज्ञानासाठी प्रेरणा मिळू शकते.

मधमाश्या त्यांच्या पोळ्याच्या बांधकामात मेणाचा वापर करतात, जे त्यांच्या शरीरातून तयार होते. प्रत्येक मधमाशी थोड्या प्रमाणात मेण तयार करते आणि ते योग्य ठिकाणी जमा करते. ‘पोळे बांधणे हे मधमाश्यांचे सामूहिक समस्यानिराकरणाचे सुंदर उदाहरण आहे,’ असे कोलोरॅडो विद्यापीठातील संगणक विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक ओरिट पेलेग यांनी म्हटले आहे. मधमाश्यांना मध तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. एक पौंड (119.74) मध तयार करण्यासाठी सुमारे 20 लाख फुलांचा रस गोळा करावा लागतो. त्यानंतर, एक औंस (28.3495 ग्राम) मेण तयार करण्यासाठी मधमाशीला आठ औंस (226.796 ग्राम) मध खावे लागते. म्हणूनच, मेणाचा कार्यक्षम वापर करणे मधमाश्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

चांगल्या परिस्थितीत, मधमाश्या पोळ्यात परिपूर्ण षटकोनी रचना तयार करतात. पोळे तयार करताना मधमाश्या जागेचा कार्यक्षम वापर करतात. त्यामुळे त्यांना पोळे तयार करण्यासाठी साहित्य कमी लागते. परंतु, नैसर्गिक निवासस्थानांमध्ये, जसे की झाडांचे खोड, घरांचे कोपरे किंवा लाकडी चौकटी, पृष्ठभाग सपाट नसतात. अशा अनियमित पृष्ठभागांवर परिपूर्ण षटकोनी रचना बांधणे कठीण असते. तरीही, मधमाश्या आपली रचना कार्यक्षम ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करतात.

संशोधकांनी मधमाश्यांच्या या बांधकाम पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी 3 D-प्रिंटेडच्या पायाभूत रचना तयार केल्या. या रचनांमध्ये वेगवेगळ्या आकारांचे षटकोन तयार केले. त्यातील काही नेहमीपेक्षा लहान, काही मोठे, तर काही सरासरी आकाराचे होते. या रचना कोलोरॅडोच्या बाऊल्डर क्रीकजवळील मधमाश्यांच्या पोळ्यांमध्ये ठेवण्यात आल्या. मधमाश्यांनी या रचनांवर पोळी बांधली आणि संशोधकांनी एक्स-रे मायक्रोस्कोपीद्वारे त्या रचनांचे विश्लेषण केले. त्यातून असे दिसून आले की, मधमाश्या अनियमित पृष्ठभागांवर आपली रचना सुधारण्यासाठी अनेक रणनीती अवलंबतात. लहान षटकोनी आकाराच्या पोळ्यांची रचना निर्माण करण्यासाठी मधमाश्या जवळच्या कक्षांना एकत्र करतात, जेणेकरून जागा कार्यक्षम वापरली जाते. मोठा षटकोन बांधताना आणि मधले स्तर तयार करतात. ही त्यांची सर्व रणनीती एकमेकांशी मिळते. मधमाश्यांचे पोळे निर्माण करण्याचे काम कधीही थांबवत नाही. त्या अनियमित पोळ्याच्या पृष्ठभागांवर काम करतात.

तंत्रज्ञानासाठी प्रेरणा

या संशोधनाचे परिणाम केवळ मधमाश्यांपुरते मर्यादित नाहीत. मधमाश्यांच्या या बांधकाम पद्धतीतून 3ऊ प्रिंटिंग आणि वास्तुशास्त्र यांसारख्या क्षेत्रांना फायदा मिळू शकतो. मधमाश्या स्थानिक नियमांचे पालन करून आणि सामूहिकपणे काम करून जटिल रचना तयार करतात. जर 3ऊ प्रिंटर या पद्धतीचा अवलंब करू शकले, तर सामग्रीचा अपव्यय कमी होऊ शकतो आणि उत्पादनाची विश्वसनीयता वाढू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news