अंतराळात असे धुतात केस!

महिला अंतराळवीरानं शेअर केला 'हेअरवॉश'चा व्हिडिओ
Hair washing in space
अंतराळात असे धुतात केस!
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दीर्घकाळ राहणारे अनेक अंतराळवीर असतात. पृथ्वीच्या कक्षेतील या स्थानकातील जीवन कसे असते याबाबत नेहमीच लोकांना कुतूहल असते. अवकाशात ही मंडळी काय खातात, आंघोळ कशी करतात इथपासून ते केस कसे धुवतात? हे असेही प्रश्न कायमच कुतूहलापोटी विचारण्यात येतात. तुम्हाला माहितीये का, केसांच्या दाटीप्रमाणं आणि लांबीप्रमाणं प्रत्येक अंतराळवीराचं हेअरवॉश रुटीन म्हणजेच केस धुण्याची पद्धतही वेगवेगळी असते!

कॅरेन नायबर्ग या महिला अंतराळवीरानं एका व्हिडीओच्या माध्यमातून गुरुत्वाकर्षणाचा अभाव असणार्‍या याठिकाणी नेमकं हेअरवॉश कसं केलं जातं याचा एक व्हिडीओ नासाच्या माध्यमातून शेअर केलेला आहे. हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा असला तरीही तो आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जवळपास दशकाभरापूर्वी, 2012 मध्ये ‘एक्सपिडिशन 36’ या अवकाश मोहिमेमध्ये तिने अवकाशात केस कसे धुता येतात याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. या व्हिडीओमध्ये ती यासाठी गरम पाण्याचा वापर करताना दिसत आहे. एक विशिष्ट प्रकारचा शॅम्पू जो (पे-ीळपीश ीहरािेे), फणी, आरसा आणि टॉवेल या सर्व गोष्टी हाताशी घेत ती व्हिडीओमध्ये केस धुताना दिसली होती. अवकाशात केस धुण्याची संपूर्ण प्रक्रिया ही इथं पृथ्वीवरील हेअरवॉशपेक्षा पूर्णच वेगळी आहे. इथं गुरुत्वाकर्णाअभावी तरंगणारे पाण्याचे थेंब हेरून ते केसांवर लावण्यापासूनच कसरत अंतराळवीरांना करावी लागते हे व्हिडीओ पाहताना लक्षात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news