

रायपूर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे असंख्य फोटो, व्हिडीओ दररोज शेअर केले जातात. त्यापैकी काही रातोरात व्हायरल होतात तर काही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचे घर तर बांधले गेले; पण त्यासाठी जमिनीचा वापर झाला नाही. हा एक प्रकारचा जुगाडच म्हणावा लागेल. कारण, इंजिनिअरने जमिनीचा वापर न करता त्याच जागेवर घर बांधले.
आता असे म्हटल्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील की, हे कसे शक्य आहे किंवा नक्की असे काय केले असावे? की एका रस्त्यावर घर बांधले गेले आहे; पण घराच्या फाऊंडेशनसाठी जागेचा वापर न करता ते बाजूला पिलर बांधून तयार केले गेले आहे. हे कसे शक्य आहे? असा प्रश्न पडला असेल तर आधी हा फोटो पाहता येईल. सध्या व्हायरल होत असलेला फोटो एका गावातील आहे. गावात अनेक घरे बांधली गेली आहेत. मात्र, अनोख्या पद्धतीने बांधलेल्या घरामुळे त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच भिंत बांधली आहे आणि मध्येच लोकांना ये-जा करण्यासाठी जागा सोडली आहे.
ही भिंत बांधल्यानंतर त्यांनी त्यावर स्वत:साठी दोन मजली घर बांधले. याचा अर्थ, त्या व्यक्तीने रस्त्याच्या वर आपले घर बांधले, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला गेला आहे. फोटो पोस्ट करताना ‘जमिनीवर कब्जा न करता घर बांधले’, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यामुळे युजर्सदेखील इम्प्रेस झाले आहेत, त्यांनी या पोस्टवर कमेंटस्चा अक्षरश: पाऊस पाडला. अनेकांनी याला भारतीयांचा जुगाड म्हटले आहे, तर काहींनी या घराच्या इंजिनिअरला 21 तोफांची सलामी द्यायला हवी, असेदेखील म्हटले आहे.