

बीजिंग : चीन आज केवळ अत्याधुनिक इमारती, वळणावळणाचे रस्ते आणि यंत्रांसाठीच नाही, तर आपल्या कल्पक ‘बुकस्टोअर्स’साठीही जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. उत्तर चीनमधील तियानजिन येथे असलेले एक पुस्तक विक्री केंद्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले असून, त्याची तुलना थेट ‘हॅरी पॉटर’मधील ‘हॉगवर्टस्’शी केली जात आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये उघडलेल्या या ‘झोंगशुगे’ बुकस्टोरमध्ये पाऊल ठेवताच ग््रााहकांचे स्वागत भव्य अकॉर्डियन स्टाईल स्ट्रक्चर आणि वळणावळणाच्या पायऱ्यांनी होते. याचे तीन मजली उंच खांब आणि छतावरील कमानी पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. हे दुकान केवळ पुस्तकप्रेमींसाठीच नाही, तर सेल्फी प्रेमींसाठीही एक ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. कोरोना महामारीनंतर छापील पुस्तकांच्या विक्रीत पूर्वीसारखी वाढ झालेली नाही, तरीही चीनमध्ये प्रत्यक्ष पुस्तकालयांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, देशांतर्गत उपभोग वाढवण्यासाठी आणि ई-कॉमर्सला टक्कर देण्यासाठी अशा अनोख्या वैशिष्ट्यांच्या पुस्तकालयांची लाट आली आहे. या बुकस्टोअरचे इंटिरिअर इतके आकर्षक आहे की, पर्यटक येथे केवळ पुस्तके खरेदी करण्यासाठी येत नाहीत, तर हातात सेल्फी स्टिक आणि ट्रायपॉड घेऊन फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. जमिनीवर ‘फोटोसाठी सर्वोत्तम जागा’ असे मार्कर्स देखील लावण्यात आले आहेत. बीजिंगचे आर्किटेक्ट झेंग शिवेई यांच्या मते, चिनी बुकस्टोअर्स आता ‘इन्स्टाग््राामेबल’ (फोटोसाठी योग्य) इंटिरिअरवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.
मात्र, या वाढत्या पर्यटनामुळे काही समस्याही निर्माण होत आहेत. जून महिन्यात नानजिंगमधील एका प्रसिद्ध बुकस्टोरमध्ये पर्यटकांची इतकी गर्दी झाली की, तिथे फ्लॅश फोटोग््रााफी, ट्रायपॉड आणि परवानगीशिवाय फोटोशूटवर बंदी घालण्यात आली. अभ्यासासाठी आणि वाचनासाठी येणाऱ्या लोकांना पर्यटकांच्या वावरामुळे आणि आवाजामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.