समुद्रातून निर्माण झाला उत्तुंग हिमालय!

हिमालय पर्वत हा पृथ्वीवरील सर्वात विशाल पर्वत
himalay mountains
हिमालय पर्वतPudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : जगातील सर्वात उंच अशी दहा पर्वतशिखरे जिथे आहेत त्या हिमालय पर्वताचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. आपल्या केवळ भौगोलिकच नव्हे तर धार्मिक, सांस्कृतिक जीवनातही या ‘नगाधिराजा’चे मोठेच महात्म्य आहे. गीतेतही भगवंताने ‘स्थावराणां हिमालयः’ अशा शब्दांमध्ये ही आपलीच एक विभुती असल्याचे म्हटले आहे. असा हा हिमालय चक्क समुद्रातून निर्माण झाला होता, असे म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे!

हिमालय पर्वत हा पृथ्वीवरील सर्वात विशाल पर्वत आहे. मात्र, या हिमालय पर्वताच्या जागी एकेकाळी विशाल समुद्र होता. हिमालयाची निर्मिती 4.70 कोटी वर्षांपूर्वीची असल्याचा दावा अनेक संशोधक करतात. हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. 4.70 कोटी वर्षांपूर्वी भारतीय व युरेशियन प्लेटस एकमेकांवर आदळल्या तेव्हा हिमालयाची निर्मिती झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हिमालय पर्वताच्या जागी टेथीस समुद्र होता. टेथीसच्या तळातील गाळाच्या खडकांवर पडलेल्या दाबामुळे तो भाग उंचावत गेला.स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात प्लँक्टनचे (समुद्रात तरंगणारे जीव) रुपांतर एका चिकट पदार्थांमध्ये झाले. ज्यामुळे खडक एकमेकांना चिकटून विशालकाय पर्वत उभे राहिले. हिमालय पर्वत रांगेत 15 हजारांपेक्षा जास्त ग्लेशियर्स म्हणजेच हिमनद्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news