5 Lakh for 100 Rupees | ‘इथे’ भारताच्या १०० रुपयांच्या मोबदल्यात मिळतात ५ लाख!

एक रुपयाच्या मोबदल्यात ४९० ते ५०० रुपये!
5 Lakh for 100 Rupees |
5 Lakh for 100 Rupees | ‘इथे’ भारताच्या १०० रुपयांच्या मोबदल्यात मिळतात ५ लाख!
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : जगात काही देशांची करन्सी ही अतिशय मजबूत असते, तर काही देशांच्या करन्सीचं मूल्य हे तुलनेनं कमी असतं. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांची करन्सी ही भारताचा रुपयापेक्षा खूप जास्त मजबूत आहे. तुम्ही जर या देशामध्ये जाऊन भारतीय रुपया एक्सचेंज कराल तर तुम्हाला लाखो रुपयांच्या बदल्यात फक्त काही हजार रुपयेच मिळतील. उदाहरण द्यायचं झालं तर आपण अमेरिकेच्या डॉलरचं देऊ शकतो. अमेरिकन डॉलर हे अमेरिकेचं अधिकृत चलन आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत ते खूपच मजबूत आहे. सध्या ९५.१२ रुपये प्रति डॉलर असा विनिमय दर सुरू आहे. याचाच अर्थ असा की, जेव्हा तुम्ही ९५.१२ रुपये देता, तेव्हा तुम्हाला त्याबदल्यात एक डॉलर मिळू शकतो. मात्र जगात असेदेखील काही देश आहेत, ज्या देशांच्या चलनाचं मूल्य हे भारतापेक्षा खूप कमी आहे. त्यामध्येच इराणचा समावेश होतो.

अशा देशांमध्ये तुम्ही जेव्हा फिरण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी अगदी स्वस्त मिळतात. उदाहरण द्यायचं झालं तर, समजा तुम्ही नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेलात तर तुम्हाला तिथे सर्व गोष्टी स्वस्त मिळतील. कारण नेपाळच्या चलनाचं मूल्य हे भारताच्या रुपयापेक्षा कमी आहे. सर्वसाधारणपणे भारताच्या एका रुपयाच्या बदल्यात नेपाळचे तुम्हाला सात ते आठ रुपये मिळू शकतात. म्हणजे भारताचे दहा रुपये हे नेपाळमध्ये ७० ते ८० रुपये होतात. त्यामुळेच आपल्याला नेपाळमध्ये भारताच्या तुलनेत अनेक गोष्टी स्वस्त वाटतात. आज आपण जगातील सर्वात स्वस्त चलनाबद्दल जाणून घेणार आहोत, ते आहे इराणचं चलन. रियाल हे इराणचं अधिकृत चलन आहे. मात्र, सध्या जागतिक बाजारामध्ये इराणी रियालचं मूल्य हे प्रचंड प्रमाणात घसरलं आहे.

सध्याच्या दरानुसार तुम्हाला जर भारतीय रुपया इराणमध्ये रियालच्या मोबदल्यात एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला तिथे एक रुपयाच्या मोबदल्यात ४९० ते ५०० रुपये मिळतात. याचाच अर्थ, जर तुमच्याकडे शंभर भारतीय रुपये असतील तर त्याची किंमत इराणमध्ये जवळपास ५ लाखांच्या आसपास होते. इराण हा सुंदर देश आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या देशाला भेट देत असतात; मात्र अलीकडच्या काळात अमेरिका आणि इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news