Henry Ford Book | तब्बल 64 वर्षांनंतर ग्रंथालयात परत आले हेन्री फोर्डवरील पुस्तक

Henry Ford Book |
Henry Ford Book | तब्बल 64 वर्षांनंतर ग्रंथालयात परत आले हेन्री फोर्डवरील पुस्तक
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यामधून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. येथील रिचलँड पब्लिक लायब्ररीतून नेलेले हेन्री फोर्ड यांचे एक चरित्र तब्बल 64 वर्षांनंतर ग्रंथालयात सुखरूप परत आले आहे.

लायब्ररीने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅलन नेविन्स लिखित फोर्ड : द टाइम्स, द मॅन, द कंपनी हे पुस्तक नुकतेच एका व्यक्तीने ग्रंथालयात जमा केले. हे पुस्तक त्याच्या एका मित्राच्या संग्रहात होते. मित्राकडून ते मिळालेल्या साहित्यात हे पुस्तक होते. या पुस्तकावर परत करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 1962 अशी नोंदवण्यात आली होती. म्हणजेच, हे पुस्तक 63 वर्षे, 11 महिने आणि 1 दिवस उशिराने परत आले आहे.

ग्रंथालय प्रशासनाच्या अंदाजानुसार, जर जुने नियम लागू असते, तर या पुस्तकावर आतापर्यंत अनेक हजार डॉलर्स इतका मोठा दंड आकारला गेला असता. मात्र, सुदैवाने लायब्ररीने 2022 पासून सर्व प्रकारचा विलंब शुल्क रद्द केला आहे. सध्या लायब्ररी केवळ हरवलेल्या पुस्तकांवर (2 आठवड्यांपेक्षा जास्त उशीर झाल्यास) शुल्क आकारते; परंतु पुस्तक चांगल्या स्थितीत परत केल्यास ते शुल्कही माफ केले जाते.

अजून एक पुस्तक येणार!

पुस्तक परत करणार्‍या व्यक्तीने ग्रंथालयाला आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्याकडे या संग्रहात लायब्ररीचे अजून एक पुस्तक सापडले असून, ‘वाचून पूर्ण होताच तेही परत करेन,’ असे आश्वासन त्याने कर्मचार्‍यांना दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news