नवी दिल्ली :
एका मोटारसायकल कंपनीने आता असे हेल्मेट विकसित केले आहे जे मेंदूतील विचारांच्या सहाय्याने आंशिक रूपात बाईकला नियंत्रित करू शकेल. या बाईकमध्येही त्यासाठी विशिष्ट सेन्सरचा वापर असेल. अशा अनोख्या यंत्रणेच्या पेटंटसाठीही अर्ज करण्यात आला आहे.
मोटारसायकल नियंत्रित करीत असताना मेंदूच हात किंवा पायाला वेगवेगळे संकेत पाठवत असतो. अशा संकेतांवर अध्ययन करून हे हेल्मेट विकसित करण्यात आले आहे. हे हेल्मेट अद्ययावत मोटारसायकलबरोबरच दिले जाईल. तिच्यामध्ये इनबिल्ट न्यूरल सेन्सर असतील जे रायडरच्या विचारांना सहजपणे पकडतील. बाईकचा ऑनबोर्ड कॉम्प्युटर या सिग्नल्सना पकडून रायडरच्या इच्छेनुसार आवश्यक सेटिंगची योजना करील. सध्याच्या बहुतांश प्रिमियम बाईकमध्ये रायडर असिस्ट फिचर्स असतात. त्यामध्ये व्हिली कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, पॉवर मोड आणि अन्यही काही फिचर्सचा समावेश आहे. याशिवाय सक्रिय रडार प्रणाली असलेली बाईकही बाजारात आलेली आहे. आता ही नवी बाईक चालवणार्या व्यक्तीच्या मेंदूचे 'इनपूट' समजणेही शक्य होणार आहे.