

नवी दिल्ली : महिलांमध्ये मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी हृदयविकार हे एक प्रमुख कारण आहे. हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कर्करोगापेक्षाही जास्त आहे. स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात, ज्यामुळे अनेकदा या समस्येकडे दुर्लक्ष होते. स्त्रियांमधील हृदयविकाराची कारणे, लक्षणे आणि बचावाचे उपाय जाणून घेऊया. हृदयविकाराची अनेक कारणे असू शकतात, जसे की कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूमपान आणि आनुवंशिकता. मात्र, स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे काही अतिरिक्त जोखीम घटक (Risk Factors) असतात, ज्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
प्री-एक्लेम्पसिया : गर्भधारणेदरम्यान प्री-एक्लेम्पसिया म्हणजेच उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. अनेकदा स्त्रिया या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओसएस), ल्युपस आणि संधिवात यांसारखे आजार स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढवतात.
मुदतपूर्व रजोनिवृत्ती : वयाच्या 45 व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती आल्यास हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. रजोनिवृत्ती दरम्यान ‘इस्ट्रोजेन’ हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. पुरुषांमध्ये सहसा रक्तवाहिन्यांमधील अडथळे हे हार्ट अटॅकचे कारण असते.
परंतु स्त्रियांमध्ये यासोबतच कोरोनरी मायक्रोव्हस्कुलर डिसीज होण्याची शक्यता जास्त असते, जो सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. याशिवाय, ‘बोकन-हार्ट सिंड्रोम’ आणि धमन्यांचे नुकसान होणे यासारख्या स्थिती देखील हार्ट अटॅकचे कारण बनू शकतात. बऱ्याच वेळा ‘एंजिओग््रााफी’ सारख्या सामान्य चाचण्यांमधून स्त्रियांमधील हृदयाच्या समस्यांचे अचूक निदान होऊ शकत नाही. अशा वेळी डॉक्टर्स पीईटी स्कॅन, एमआरएआय आणि इतर प्रगत चाचण्यांचा सल्ला देऊ शकतात.