Soaked Figs Benefits | भिजवलेले अंजीर खाण्याचे आरोग्यासाठी अनेक लाभ

Soaked Figs Benefits
Soaked Figs Benefits | भिजवलेले अंजीर खाण्याचे आरोग्यासाठी अनेक लाभPudhari File Photo
Published on
Updated on

तुम्हालाही दिवसभर थकल्यासारखे आणि अशक्त वाटते का? शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते का? जर होय, तर याचे उत्तर तुमच्या घरातच दडलेले आहे. होय, आपण भिजवलेल्या अंजीराबद्दल बोलत आहोत. अंजीर एक असे सुपरफूड आहे, ज्याला अनेक वर्षांपासून आरोग्याचा खजिना मानले जाते. ते केवळ स्वादिष्टच नाही, तर ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. चला, जाणून घेऊया अशाच 5 महत्त्वाच्या फायद्यांबद्दल, जे जाणून घेतल्यावर तुम्हीही आजपासूनच त्यांचा तुमच्या आहारात समावेश कराल. तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती...

बद्धकोष्ठतेपासून आराम

जर तुम्ही दीर्घकाळच्या बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल, तर अंजीर तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे मलप्रवाहात सुलभता आणते. रात्री भिजवलेले अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची आतडी स्वच्छ होतात आणि तुमची पचनसंस्था पूर्वीपेक्षा चांगली काम करू लागते.

हाडे मजबूत बनवते

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात. अंजीर हे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजांचा उत्तम स्रोत आहे, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले अंजीर खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस (हाडे कमजोर होण्याचा आजार) सारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते.

हृदयाला निरोगी ठेवते

अंजीरामध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, तर अँटिऑक्सिडंटस् शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सशी लढतात, ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर अंजीरचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा. अंजीरातील फायबरमुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता. तसेच, गोड असूनही त्यात कॅलरी कमी असतात.

निरोगी त्वचा आणि केस

तुम्हाला माहीत आहे का की अंजीर तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे? होय, त्यात असलेले व्हिटॅमिन आणि खनिज त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे चेहर्‍यावर नैसर्गिक चमक येते. याशिवाय, ते केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे थांबवतात.

भिजवलेले अंजीर कसे खावे?

रात्री 2-3 सुके अंजीर एका छोट्या वाटीत पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर पाणी गाळून घ्या आणि भिजवलेले अंजीर खा. तुम्ही हे भिजवलेले अंजीर दुधासोबतही घेऊ शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news