

नवी दिल्ली : आंबट-गोड पेरूची फोड खाणे हे केवळ पोपटांनाच नव्हे, तर सर्वांनाच आवडते. हिवाळ्यात पेरू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पेरू चवीला तर चांगला लागतोच; पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पेरूत अनेक पोषकतत्त्वे असतात. तसंच, त्वचेसाठीही पेरू खूप फायदेशीर आहे. काही जण पेरूच्या बिया फेकून देतात किंवा खात नाहीत; पण पेरूच्या बियाही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पेरूच्या बियात कोणते गुणधर्म असतात, हे जाणून घेऊया.
पेरूच्या बियांचे सेवन केल्यास पचनसंस्था मजबूत होते. बियांमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते जे पाचनसंस्था सुधारण्यास मदत करते. पेरूच्या बियांचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळते. त्यामुळं हिवाळ्यात पेरूचे सेवन आवश्यक करावे. पेरूच्या बियांचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. बियांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळं पेरू खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळं जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर पेरू नक्की खायला पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीनची मात्रा अधिक असते. जी शुगर आणि शुगर कंपाऊंड तोडण्यास मदत करते. त्यासाठी पेरूचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. पेरूची पाने ही नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. त्यामुळं शरीर निरोगी राहते. पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीबॅक्टिरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यासोबतच यामध्ये पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉईडस्, फ्लेव्होनॉईड्ट आणि टॅनिन ही रसायने आढळतात. जे विविध रोगांवर उपचार करण्यास प्रभावी ठरतात. अनेक ठिकाणी पेरूच्या पानांचा रस औषध म्हणून करतात. जपानमध्ये लोक हर्बल टी बनवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करतात.