Gut bacteria stress link | टेन्शनला फक्त ’ओव्हरथिंकिंग’ नाही, तर पोटातील बॅक्टेरियाही जबाबदार!

नव्या संशोधनातून धक्कादायक खुलासा
Gut bacteria stress link |
Gut bacteria stress link | टेन्शनला फक्त ’ओव्हरथिंकिंग’ नाही, तर पोटातील बॅक्टेरियाही जबाबदार!
Published on
Updated on

व्हिएन्ना : आपल्याला जेव्हा तणाव जाणवतो, तेव्हा त्याचे कारण बाह्य परिस्थिती किंवा अतिविचार आहे, असे आपल्याला वाटते. मात्र, आता एका नवीन संशोधनाने सर्वांनाच चकीत केले आहे. आपल्या मानसिक तणावासाठी केवळ मन नाही, तर आपल्या पोटातील (आतड्यांमधील) बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूदेखील कारणीभूत असू शकतात, असा खुलासा व्हिएन्ना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे.

आपल्या आतड्यांमध्ये कोट्यवधी सूक्ष्मजीव राहतात, ज्यांना शास्त्रोक्त भाषेत ‘गट मायक्रोबायोम’ असे म्हटले जाते. हे सूक्ष्मजीव केवळ अन्न पचवण्याचे काम करत नाहीत, तर आपली चयापचय शक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेष म्हणजे, हे सूक्ष्मजीव थेट आपल्या मेंदूशी जोडलेले असतात. प्रौढ व्यक्तींमधील आतड्यांतील बॅक्टेरियांची विविधता आणि त्यांच्याद्वारे तयार होणारे चयापचय पदार्थ यांचा तणावाशी खोलवर संबंध असल्याचे संशोधनात आढळले आहे. ज्यांच्या आतड्यांमध्ये सूक्ष्मजीवांची विविधता अधिक असते, त्यांची तणावाच्या प्रसंगी दिली जाणारी शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया अधिक संतुलित असते. म्हणजेच, एखादी कठीण परिस्थिती तुम्ही किती शांतपणे हाताळता, हे तुमच्या पोटातील बॅक्टेरिया ठरवू शकतात.

आतड्यांतील बॅक्टेरिया ‘शॉर्ट चेन फॅटी अ‍ॅसिड’ तयार करतात. ही प्रक्रिया तीव— तणावाच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. संशोधकांच्या मते, जर आपण आपल्या आतड्यांचे आरोग्य सुधारले आणि तेथील बॅक्टेरियांची रचना समजून घेतली, तर भविष्यात तणाव आणि मानसिक व्याधींवर अधिक प्रभावी उपचार करणे शक्य होईल. केवळ औषधोपचारांऐवजी, आहारात बदल करून पोटाचे आरोग्य सुधारल्यास तणावापासून मुक्ती मिळवण्याची एक नवी पायवाट या संशोधनामुळे निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news