wedding viral news | वरात थांबवून नवरदेवाने काढले दुचाकीचे पंक्चर!

wedding viral news |
wedding viral news | वरात थांबवून नवरदेवाने काढले दुचाकीचे पंक्चर!
Published on
Updated on

नवी दिल्ली : सोशल मीडियावर लग्नातील नवरदेवाचे अनेक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरदेव डान्स करताना दिसतो, तर कधी त्याची एंट्री चर्चेचा विषय ठरते. मात्र, सध्या एका अशा नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने आपल्या लग्नाच्या दिवशी जे काम केले, ते पाहून नेटकरी त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत. हा नवरदेव भर वरातीत आपली बग्गी सोडून एका दुचाकीचे पंक्चर काढताना दिसत आहे.

‘डरीरश्र तूरपसूर’ नावाच्या युजरने एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसतोय की, अंगावर लग्नाचा भरजरी पोशाख, डोक्यावर बाशिंग आणि हातावर मेहंदी असलेला नवरदेव रस्त्याच्या कडेला बसून एका दुचाकीच्या टायरचे पंक्चर काढत आहे. त्याने आपल्या कोटाच्या बाह्या वर सारल्या आहेत आणि तो पूर्ण तन्मयतेने काम करत आहे. दाव्यानुसार, हा नवरदेव बँड-बाजा आणि डीजेच्या तालावर आपली वरात घेऊन निघाला होता. त्याच वेळी रस्त्यात त्याला एक व्यक्ती दिसली, जी आपल्या आजारी आईला दुचाकीवरून दवाखान्यात घेऊन जात होती.

मात्र, दुर्दैवाने वाटेतच त्या दुचाकीचे टायर पंक्चर झाले. रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा आणि त्या व्यक्तीची अडचण पाहून नवरदेव तत्काळ मदतीला धावून आला. व्हिडीओमध्ये नवरदेव ‘प्लगिंग’ पद्धतीने ट्यूबलेस टायरचे पंक्चर काढताना दिसत आहे. बाहेरून रबर स्ट्रिप टाकून त्याने टायरमधील छिद्र बंद केले आणि त्या व्यक्तीला तत्काळ दवाखान्यात जाण्यासाठी मदत केली. स्वतःच्या लग्नाचा आनंद बाजूला ठेवून एका अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी आणि माणुसकीसाठी त्याने घेतलेल्या या निर्णयाने सर्वांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वार्‍यासारखा व्हायरल झाला असून, आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news