ग्रीसची राजकुमारी भारतीय तरुणाची अर्धांगिनी

greek-princess-marries-indian-man
ग्रीसची राजकुमारी भारतीय तरुणाची अर्धांगिनीPudhari File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क : परी कथेतील राजकुमारीची प्रेमकथा सर्वांनाच भावते. सध्या अशीच एक राजकुमारी आणि त्या राजकुमारीची प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरत आहे. ही राजकुमारी सातासमुद्रापारची असली तरीही ती ज्याच्या प्रेमात पडलीये तो मात्र भारतीय वंशाचा असल्या कारणानं भारतातही या प्रेमकहाणीची जरा जास्तच चर्चा सुरू आहे. ही राजकुमारी ग्रीसची असून तिचे नाव थिओडोरा व ती ज्या भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली त्याचे नाव आहे मॅथ्यू कुमार. जवळपास 8 वर्षांच्या नात्यानंतर हे प्रेमी युगुल लग्नबंधनात अडकले. 2018 मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. यानंतर वर्षभरातच ही जोडी डेहराडूनला आली आणि तिथे त्यांचा हळदी समारंभ पार पडला. 2020 मध्येच त्यांना लग्न करायचं होतं; मात्र कोरोनाच्या संकटामुळं तेव्हाचा मुहूर्त टळला आणि अखेर हळदीनंतर पाच वर्षांनी म्हणजे 2024 च्या डिसेंबर महिन्यात या जोडीनं वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली.

दिवंगत राजा कॉन्स्टेंटाइन आणि राणी अ‍ॅनी मेरी यांची मुलगी, 41 वर्षीय थिओडोरानं अथेन्समध्ये लग्न केले. तिचे वडील राजा कॉन्स्टेंटाइन हे ग्रीसचे शेवटचे राजा होते. इंग्लंडचे राजा चार्ल्स यांचे ते खूप चांगले मित्र आणि प्रिन्स विल्यम यांचे ‘गॉडफादर’ म्हणवले जात होते. 1973 पासून ग्रीसमध्ये राजेशाही संपुष्टात आली असली तरीही थिओडोरा आणि तिच्या कुटुंबानं शाही थाटातच या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. राजकुमारी थिओडोराचा जन्म बि—टनचा आणि पुढे उच्च शिक्षणासाठी तिने अमेरिकेची वाट धरली. 2016 मध्ये तिची आणि मॅथ्यू कुमारची भेट झाली. 2018 मध्ये या जोडीने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करत साखरपुडा उरकला.

मॅथ्यू कुमार हा मूळचा कॅलिफोर्नियातील रहिवासी असून तो एक वकील आहे. 1990 मध्ये शैलेंद्र ‘सॅम’ कुमार आणि योलांडा शेरी रिचर्डस् या जोडीच्या नात्यात मॅथ्यूचा जन्म झाला. शैलेंद्र मूळचे भारतीय वंशाचे असल्याने त्यांचा मुलगासुद्धा भारताशीच जोडला गेला. मॅथ्यू अमेरिकेत लहानाचा मोठा झाला; मात्र त्याच्या कुटुंबाची पाळंमुळं भारतात असल्यामुळे त्याने भारतातच हळदी समारंभाचे आयोजन केले होते. मॅथ्यू आणि थिओडोरा 2020 मध्येच विवाहबंधनात अडकणार होते, पण कोरोनामुळे तेव्हा लग्न टळले आणि पुढे 2023 मध्ये या जोडीने लग्नाची तयारी केली. 2023 मध्ये कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या निधनाने लग्वन लांबणीवर पडले आणि अखेर ही जोडी 2024 मध्ये विवाहबंधनात अडकली. अथेन्समधील मेट्रोपॉलिटन कॅथेड्रलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news