Hungary Grave-Digging Competition | हंगेरीत चक्क कबर खोदण्याची स्पर्धा

फावडे-कुदळ घेऊन मैदानात उतरले १९ संघ
Hungary Grave-Digging Competition |
Hungary Grave-Digging Competition | हंगेरीत चक्क कबर खोदण्याची स्पर्धा
Published on
Updated on

बुडापेस्ट : जगभरात ‘चीज रोलिंग’, ‘केक स्मॅशिंग’ आणि ‘थप्पड मारणे’ यांसारख्या अनेक विचित्र आणि वेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. केवळ मनोरंजनासाठी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धांच्या यादीत आता आणखी एका अनोख्या स्पर्धेची भर पडली आहे. हंगेरीमध्ये चक्क ‘कबर खोदण्याची’ (थडगे खणण्याची) स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये २-२ सदस्यांच्या १९ टीम्सनी (एकूण ३८ स्पर्धक) भाग घेतला होता.

उत्तर हंगेरीतील ‘न्येर्गेसुजफालू’ येथील सार्वजनिक दफनभूमीत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत प्रत्येक टीमला ८० सेंटीमीटर रुंद, २ मीटर लांब आणि १.६ मीटर खोल कबर खणायची होती. त्यानंतर खणलेली माती पुन्हा खड्ड्यात भरून त्यावर नेटका टेकडा तयार करायचा होता. उन्हाळ्यामुळे स्मशानभूमीतील माती अत्यंत कोरडी आणि कडक झाली होती. तरीही ‘रॉबर्ट नागी’ आणि त्यांचे साथीदार ‘लास्जलो’ यांनी अवघ्या १ तास २१ मिनिटांत ही मोहीम फत्ते करत विजेतेपद पटकावले. या विजयासाठी त्यांना ६४० डॉलर (सुमारे ५४ ते ६० हजार रुपये) रोख बक्षीस देण्यात आले.

‘असोसिएटेड प्रेस’च्या रिपोर्टनुसार, ‘हंगेरियन असोसिएशन ऑफ सिमेट्री मेंटेनर्स अँड ऑपरेटर’ या संस्थेकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. कबर खोदणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला ओळख मिळवून देणे आणि मृत्यूशी संबंधित असणारे गैरसमज व भीती दूर करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. विजेते रॉबर्ट नागी म्हणाले, ‘या स्पर्धेत केवळ देखावा नाही, तर वेगाला खूप महत्त्व आहे. अंतिम संस्कारासाठी कबर खोदताना तिचा आकार योग्य असणे आणि ती सुरक्षितपणे खणली जाणे अत्यंत गरजेचे असते.’ या स्पर्धकांनी प्रचंड उकाड्यात घाम गाळत हे कठीण काम पूर्ण करून उपस्थितांची मने जिंकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news