GPT-6 Model | ‘जीपीटी -6’ मॉडेल करणार सायबर सुरक्षा

GPT-6 Model |
GPT-6 Model | ‘जीपीटी -6’ मॉडेल करणार सायबर सुरक्षा
Published on: 
Updated on: 

बंगळूर : ओपन एआय कंपनीने सुरक्षा त्रुटी शोधण्यासाठी आणि त्यांचे परीक्षण करण्यासाठी जीपीटी -6 सायबर हे नवीन मॉडेल लाँच केले आहे. हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) गैरवापर वाढल्यामुळे सुरक्षा संशोधकांना धोके शोधण्यात आणि हल्लेखोर हल्ला करण्यापूर्वी त्या दुरुस्त करण्यात मदत व्हावी, या हेतूने हे मॉडेल तयार केले आहे.

या मॉडेलची प्रमुख वैशिष्ट्ये

या मॉडेलचा वापर करून मोझिलाने उच्च स्वरूपाच्या मानलेल्या ८१ नवीन फायरफॉक्स त्रुटी शोधल्या, ज्यावर मोझिलाने आता दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. या मॉडेलने लिनक्स कर्नेलच्या ९४८ त्रुटींसाठी काम करणारे एक्स्प्लॉईटस्‌ विकसित करण्यास मदत केली, ज्यामध्ये ५८८ त्रुटी पूर्णपणे नवीन होत्या. कंपनीने लिनक्सच्या देखभालकर्त्यांकडे सुचवलेल्या पॅचेससह ३०४ गंभीर निष्कर्ष उघड केले आहेत. यापूर्वीच्या ‘GPT-5.6 सायबर’ मॉडेलचे सुरक्षा वर्गीकरण ‘हाय’ होते, जे आता ‘GPT-6 सायबर’साठी वाढवून ‘क्रिटिकल’ करण्यात आले आहे. पेंट्रेरेशन टेस्टिंग आणि एक्स्प्लॉईट डेव्हलपमेंटसारख्या प्रगत, अधिकृत सुरक्षा कामांसाठी असलेल्या ‘डेब्रेक रेड’ या ओपेन एआयच्या एक्सेस टियरमधील निवडक ग्राहकांसाठी हे मॉडेल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.