‘गुगल’वर ’हे’ सर्च केल्यावर दिसेल जादू...

गुगल हे जगातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे
google search magic trick
‘गुगल’वर ’हे’ सर्च केल्यावर दिसेल जादू...Pudhari File Photo
Published on
Updated on

गुगल हे जगातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे. दररोज कोट्यवधी लोक वेगवेगळ्या गोष्टी सर्च करण्यासाठी याचा वापर करतात. आपल्याला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर मिळवता येते. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगल विश्वसनीय स्रोत मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, की गुगलवर काही खास शब्द सर्च केल्यास तुमच्या स्क्रीनवर मजेदार आणि अजब प्रकार होतो? काहीवेळा स्क्रीन हलते, काहीवेळा विचित्र अ‍ॅनिमेशन दिसते. बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नसते. अशा शब्दांची ही माहिती...

Drop Bear

जर तुम्ही गुगलवर ‘Drop Bear ’ हा शब्द टाइप करून सर्च केला, तर तुम्हाला एक छोटा अस्वल (bear) दिसेल. या छोट्या अस्वलावर क्लिक करताच हा अस्वल स्क्रीनवरून खाली पडतो आणि पडताच तुमची स्क्रीन हलू लागते. सर्व स्क्रीनवर झाडाची पाने पसरतात. हे एक मजेदार द़ृश्य असून स्वतः गुगलनेच तयार केले आहे.

Chixuclub

‘Chixuclub’ हा शब्द गूगलवर सर्च करताच एक मोठा लघुग्रह स्क्रीनवरून खाली पडताना दिसतो. हा दगड पडल्यावर संपूर्ण स्क्रीन काही सेकंदांसाठी जोरात हलते. ही कृती पाहताना असे वाटते की जणू आकाशातून मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळतोय. मेक्सिकोच्या चिक्सुलब येथे कोसळलेल्या लघुग्रहामुळेच पृथ्वीवरून डायनासोरचे साम—ाज्य नष्ट झाले होते.

" Dart Mission‘

" Dart Mission‘ हा शब्द सर्च करताच तुमची स्क्रीन वाकडी होईल. सर्च केल्यानंतर एक उपग्रह डावीकडून उजवीकडे जाताना दिसतो आणि नंतर अचानक गायब होतो. त्यानंतर गूगल पेज हलकसं तिरकं होते आणि सगळं उलटं- सुलटं वाटू लागतं. डार्ट मोहिमेतून लघुग्रहाची दिशा बदलण्याबाबतचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता.

Last of Us

जर तुम्ही ‘ Last of Us‘ हा शब्द गूगलवर सर्च केला, तर तुम्हाला स्क्रीनच्या खाली एक मशरूम दिसेल. जर तुम्ही त्या मशरूमवर टॅप केले, तर स्क्रीनवर बुरशी वाढू लागते. तुम्ही जितक्या वेळा मशरूमवर क्लिक कराल, तितकी बुरशी वाढत जाईल. हा इफेक्ट प्रसिद्ध ‘ Last of Us‘ गेम आणि त्याच्या स्टोरीशी संबंधित आहे.

तुम्ही स्वतः हे शब्द सर्च करून पाहू शकता आणि तुमच्या मित्रांना देखील हे गूगलचे रहस्य सांगू शकता. असे अनेक ईस्टर एग्ज (लपवलेले इफेक्ट्स) गूगलमध्ये आहेत. हे शोधायला आणि अनुभवायला खूप मजा येते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news