Donkey Milk Soap | गाढविणीच्या दुधाच्या साबणाला जगभरात वाढती मागणी

Global Demand increasing for Donkey Milk Soap
Donkey Milk Soap | गाढविणीच्या दुधाच्या साबणाला जगभरात वाढती मागणी
Published on
Updated on

दुबई : आतापर्यंत तुम्ही चंदन, कोरफड, कडूनिंब, गुलाब अशा अनेक सुगंधी साबणांचा वापर केला असेल. पण, तुम्ही कधी गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाने आंघोळ केली आहे का? हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण हे सत्य आहे! जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोक हा साबण मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत आणि वापरत आहेत.

संयुक्त अरब अमिराती आणि इतर अनेक देशांमध्ये गाढविणीच्या दुधाचे साबण मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. याचे कारण काय आहे, याचे कुतूहल सर्वांनाच असू शकते. गाढविणीच्या दुधात भरपूर प्रमाणात खनिजे आणि प्रथिने आढळतात, असा दावा केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् देखील असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. हा साबण त्वचेला सूर्यप्रकाश आणि वाढत्या वयामुळे होणारे परिणाम कमी करण्यास मदत करतो.

याव्यतिरिक्त, तो त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतो. एका मीडिया रिपोर्टनुसार, अटन डाँकी मिल्क सोप नावाच्या एका कंपनीने दावा केला आहे की, ते त्यांच्या फार्ममध्ये 100 टक्के नैसर्गकि साबण बनवतात. त्यांच्या फार्ममध्ये 12 गाढवे आहेत. जॉर्डनची राजधानी अम्मान येथे या कंपनीची उत्पादन कार्यशाळा आहे आणि तेथे गाढविणीच्या दुधाच्या साबणाला मोठी मागणी आहे. दुबईमध्ये तर गाढविणीच्या दुधापासून बनवलेले विविध ब्रँडस्चे साबण मोठ्या प्रमाणावर विकले जातात.

जेव्हा हा साबण सुरुवातीला जॉर्डनमध्ये लॉन्च करण्यात आला, तेव्हा तेथील लोकांनी त्याची खूप थट्टा केली होती; पण जसजसे लोकांना त्याचे फायदे समजू लागले, तसतशी या साबणाची मागणी वाढू लागली. मीडिया रिपोर्टनुसार, एका शोधामुळे माहिती मिळाली की, गाढविणीचे दूध त्वचेच्या पेशींना पुन्हा जिवंत करण्यास, एक्झिमा सारख्या त्वचेच्या समस्या बर्‍या करण्यास आणि वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यास मदत करते. पर्यावरण कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त शिक्षक अल जुबी यांनी सांगितले की, गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाने आंघोळ केल्यास त्वचेवरील डाग, मुरुमे आणि सुरकुत्या यांसारख्या समस्या कमी होतात आणि त्वचेतील आर्द्रतेची पातळी नियंत्रित राहते. हा साबण गाढविणीच्या दुधात ऑलिव्हचे तेल, बदामाचे तेल आणि नारळाचे तेल मिसळून तयार केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news