‘तिला’ भूतकाळातील प्रत्येक गोष्ट आठवते

मुलीची स्मरणशक्ती इतरांपेक्षा वेगळी
Hyperthymesia
‘तिला’ भूतकाळातील प्रत्येक गोष्ट आठवते
Published on
Updated on

पॅरिस ः ‘न्यूरोकेस’ नावाच्या एका अहवालानुसार, फ्रान्समधील 17 वर्षांच्या एका मुलीला एक अत्यंत दुर्मीळ आजार आहे. या आजारामुळे तिला तिच्या भूतकाळातील प्रत्येक क्षण आठवतो आणि ती तिच्या भविष्यातील गोष्टी अचूकपणे सांगू शकते. पॅरिस ब—ेन इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी पॅरिस सिटीमधील तीन वैज्ञानिकांनी या मुलीवर (TL) संशोधन केले, जेणेकरून यामागचे कारण आणि भविष्यात याचा वापर कसा करता येईल, हे समजून घेता येईल.

‘टीएल’ला नेहमीच हे माहीत होते की, तिची स्मरणशक्ती इतरांपेक्षा वेगळी आहे. वैज्ञानिकांशी बोलताना तिने सांगितले की, तिच्या आठवणी कोणत्याही योगायोगाने तयार झाल्या नाहीत. तिच्या आठवणींमध्ये कुटुंब, सुट्ट्या, मित्र, शाळा आणि खेळणी अशा विविध गोष्टी आहेत. तिने सांगितले की, तिच्या सर्व आठवणी पूर्णपणे क्रमवार मांडलेल्या आहेत. तिच्याकडे इतरांनी दिलेल्या भेटवस्तूंचे टॅगही सुरक्षित आहेत, ज्यावर देणार्‍याचे नाव आणि तारीख लिहिलेली आहे. मात्र, अभ्यासाशी संबंधित घटनांना तिने ‘ब्लॅक मेमरी’ म्हटले आहे. कारण, त्या आठवणी आठवण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागते. या दुर्मीळ आजाराला ‘हायपरथायमेसिया’

(Hyperthymesia) असेही म्हणतात. यात व्यक्तीला आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटी-मोठी घटना वर्षानुवर्षे आठवते. अशा व्यक्तीची स्मरणशक्ती सामान्य माणसापेक्षा खूप वेगळी असते. टीएलच्या आंतरिक जगात आणखी तीन खोल्या आहेत. पहिली आहे थंड ‘बर्फाची खोली’, जिथे जाऊन ती तिचा राग शांत करते. दुसरी आहे ‘समस्यांची खोली’, जी रिकामी आहे. तिथे ती बसून विचार करते. तिसरी खोली आहे ‘सैनिकी खोली’, जी तिला अजिबात आवडत नाही. कारण, तिचे वडील लहानपणी सैन्यात असल्यामुळे घरापासून दूर राहत होते. टीएलच्या स्मरणशक्तीचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी तिला दोन कामे दिली. पहिल्या कामात, वैज्ञानिकांनी तिला तिच्या बालपणीच्या आणि किशोरवयीन जीवनातील घटना आठवायला सांगितल्या, ज्या तिने खूप तपशीलवार सांगितल्या. दुसर्‍या कामात तिला भूतकाळ आणि भविष्याची कल्पना करायला सांगितले. यातही तिने उत्तम कामगिरी केली आणि तिने भविष्याची अशी कल्पना केली, जी खूप खरी आणि अचूक वाटली. तिच्या बोलण्यावरून वैज्ञानिकांना असे वाटले की, तिने ते क्षण आधीच जगले आहेत. वैज्ञानिकांच्या मते, टीएलसारखी प्रकरणे भविष्यातील संशोधनाला नवीन दिशा देऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news