Sky High Lanterns | ‘इथे’ बनतात ‘आकाशाइतके उंच’ आकाशकंदील!

Sky High Lanterns |
Sky High Lanterns | ‘इथे’ बनतात ‘आकाशाइतके उंच’ आकाशकंदील!
Published on: 
Updated on: 

मनिला : दिवाळीचा सण म्हटला की, घरोघरी उजळणारे रंगीबेरंगी आणि विविध आकारांचे सुंदर आकाशकंदील हे मुख्य आकर्षण असतात; पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जगातील सर्वात मोठा आकाशकंदील किती मोठा असेल? फिलिपिन्स देशातील सॅन फर्नांडो शहरात असे गगनचुंबी आकाशकंदील बनवले जातात. या शहराला जगाची 'लँटर्न कॅपिटल' (आकाशकंदिलांची राजधानी) म्हणूनही ओळखले जाते.

फिलिपिन्सच्या पांपंगा प्रांतातील सॅन फर्नांडो शहरात दरवर्षी आयोजित केला जाणारा 'जायंट लँटर्न फेस्टिव्हल' हा जगातील सर्वात भव्य, रंगीबेरंगी आणि प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे. या उत्सवाची सुरुवात १९०८ च्या सुमारास झाली. सुरुवातीला हा सण एका साध्या धार्मिक मिरवणुकीचा एक भाग होता, ज्यामध्ये स्थानिक लोक बांबू आणि साध्या कागदापासून छोटे दिवे बनवत असत.

काळाप्रमाणे या कंदिलांच्या आकारात आणि तंत्रज्ञानात अफाट बदल होत गेला आणि आज याचे रूपांतर एका जागतिक पातळीवरील भव्य स्पर्धेत व महोत्सवात झाले आहे. या महोत्सवात सहभागी होणारे कंदील (ज्याला स्थानिक भाषेत 'पारुल सांपेर्नंदू' म्हणतात) हे पारंपारिक कंदिलांसारखे नसतात. या कंदिलांचा व्यास आणि उंची २० ते तीस फुटांपर्यंत असू शकते. एका कंदिलामध्ये १०,००० हून अधिक प्रकाशयोजना करणारे बल्ब वापरले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.