

वॉशिंग्टन : महाकाय अजगर म्हटले की, अंगावर सरसरून काटा येतो. प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर चित्रपटामध्ये दाखवले जाणारे प्रचंड आकाराचे अजगर किंवा अॅनाकोंडा येतात. जंगलांत सरपटणारे विशालकाय अजगर मानवावर हल्ला करून आपल्या विळख्यात ओढण्यास सज्ज असतात. हे सर्व काल्पनिक वाटत असले, तरी ते नेहमीच तसे नसते. कारण, जगात असे काही अजगर आहेत, जे एखाद्या माणसाला सहज गिळू शकतात. हे ऐकूनच भीतिदायक वाटत असले, तरी शंभर टक्के खरे आहे.
हे प्राणी प्राचीन, शक्तिशाली आहेत आणि त्यांच्या हालचाली आणि शिकार करण्याच्या पद्धतीत पूर्णपणे एलियन आहेत. हे अजगर वास्तविक जीवनातील भक्षक प्राणी आहेत आणि जंगल ठिकाणी राहतात, जे आपल्यापैकी बहुतेकांना कधीच दिसत नाहीत.
रेटीक्यूलेडेट अजगर, ग्रीन अॅनाकोंडा, बर्मी अजगर आणि आफ्रिकन रॉक अजगर यांसारखे अजगर हे खरे भक्षक असून, जे मानवांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. हे शक्तिशाली अजगर आग्नेय आशिया, अॅमेझॉन आणि फ्लोरिडासारख्या प्रदेशात आढळतात. त्यांच्या आकारमानामुळे आणि ताकदीमुळे ते इतरांना धोका निर्माण करतात. या प्राण्यांचे हल्ले दुर्मीळ असले, तरी ते प्राणघातक ठरू शकतात, ज्यामुळे अजगर असलेल्या भागात सावधगिरी आणि जागरूकता राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. रेटीक्यूलेडेट अजगर सर्वात लांब असेल तर ग्रीन अॅनाकोंडा सर्वात जड असतो.
अॅमेझॉन आणि दक्षिण अमेरिकेच्या दलदलीच्या भागात आढळणारा हा मांसल प्राणी 500 पौंडांपेक्षा जास्त वजनाचा असू शकतो. अॅनाकोंडा पाण्यात बराच वेळ घालवतात, जिथे ते केमन (लहान मगरी), कॅपीबारा (महाकाय उंदीर) आणि कधीकधी जग्वारसारख्या भक्ष्यांची शिकार करतात आणि हो, ते मानवाची शिकार करू शकतात. ग्रीन अॅनाकोंडाने मानवांवर हल्ला केल्याच्या काही घटना घडल्याचे सांगितले जाते. तथापि, अजूनही त्या वादग्रस्त चर्चेत अडकलेल्या आहेत. ग्रीन अॅनाकोंडाकडे असलेली ताकद आणि आकारामुळे ते निश्चितपणे मानवाची शिकार करू शकतात.