Gemini 4 Argon | जेमिनी ४ आर्गन : गूगलने आणले शक्तिशाली एआय मॉडेल

अनेक चाचण्यांमध्ये आघाडी; GPT-6 आणि क्लॉडला देणार टक्कर?
Gemini 4 Argon |
Gemini 4 Argon | जेमिनी ४ आर्गन : गूगलने आणले शक्तिशाली एआय मॉडेल
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : गूगलने आतापर्यंतचे आपले सर्वात शक्तिशाली एआय मॉडेल लाँच केले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी एक्स (X) वर माहिती शेअर करताना लिहिले, ‘‘आमच्या आगामी मॉडेलबाबत खूप चर्चा सुरू आहे, म्हणूनच मला लवकरात लवकर त्याची एक झलक दाखवायची होती. सादर करत आहोत ‘जेमिनी ४ आर्गन’ (Gemini 4 Argon). हे मॉडेल गुंतागुंतीचे वर्कफ्लो, सायबर डिफेन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये फ्रंटियर परफॉर्मन्स दाखवते.’’

सुंदर पिचाई यांनी हाही खुलासा केला की, गूगलच्या अंतर्गत टीम्स कोडिंग आणि क्वांटम कॉम्प्युटिंगसारख्या जटिल कामांमध्ये आधीपासूनच या मॉडेलचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. गूगलने आपल्या एखाद्या एआय मॉडेलसाठी ‘आर्गन’ हे नाव वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. गूगल ‘जेमिनी ४ आर्गन’ला गुंतागुंतीच्या वर्कफ्लोमध्ये खोलवर विचार करण्यासाठी तयार करण्यात आलेला फ्रंटियर मॉडेल सांगते. याची आऊटपुट टोकन लिमिट तब्बल १० लाख टोकन आहे. एवढ्या मोठ्या मर्यादेमुळे हे मॉडेल लांबलचक आणि क्लिष्ट कामांमध्ये शेकडो हजार टोकन्सपर्यंत विचार करण्यास सक्षम आहे.

कंपनीचा दावा आहे की, अनेक कामांमध्ये आर्गनची कामगिरी GPT-6 एस्ट्रा आणि क्लॉड फेबल ५.१ सारख्या ॲडव्हान्स मॉडेल्सच्या बरोबरीची किंवा त्यांच्यापेक्षाही सरस आहे. वॉल्स नॉलेज वर्क बेंचमार्क : जेमिनी ४ आर्गनने ६८.९ टक्के गुण मिळवले आहेत. तुलना करायची झाल्यास, GPT-6 एस्ट्राला ६३.१ टक्के आणि क्लॉड फेबल ५.१ ला ६५.८ टक्के गुण मिळाले. वाइब कोड बेंच : कोडिंगशी संबंधित या चाचणीतही आर्गनने ९१.९ टक्के गुणांसह सर्वोत्तम कामगिरी केली. यात क्लॉड फेबल ५.१ ने ९०.३ टक्के तर GPT-6 एस्ट्राने ८९.६ टक्के गुण मिळवले. जरी गूगलच्या या नव्या मॉडेलने बहुतांश चाचण्यांमध्ये आघाडी घेतली असली, तरी काही इतर बेंचमार्क श्रेणींमध्ये ते दुसऱ्या ॲडव्हान्स मॉडेल्सपेक्षा थोडे मागेही राहिले आहे.

‘जेमिनी ४ आर्गन’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सायबर सिक्युरिटी क्षमता. गूगलच्या मते, हे मॉडेल स्वतःच सॉफ्टवेअरमधील त्रुटी आणि धोके शोधून त्यांची पडताळणी करू शकते आणि त्यांना ठीकदेखील करू शकते. सध्या गूगलने जेमिनी ४ आर्गनची उपलब्धता मर्यादित ठेवली आहे. सध्या ‘Fairwind’ प्रोग्रामच्या माध्यमातून हे मॉडेल फक्त विश्वासू सायबर डिफेंडर्स आणि अमेरिकन सरकारलाच उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news