Bison enters in showroom: दुचाकी शोरूममध्ये गव्याचा धुमाकूळ

कन्नवम जंगलातून भरकटलेला एक गवा थेट शहरातील एका दुचाकी शोरूममध्ये घुसला
Bison enters in showroom
Bison enters in showroomPudhari
Published on
Updated on

कुन्नूर : केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कुत्तुपरंबा येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली. कन्नवम जंगलातून भरकटलेला एक गवा थेट शहरातील एका दुचाकी शोरूममध्ये घुसला आणि काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर नुकसान करून पसार झाला. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 8.10 वाजता घडली असून, संपूर्ण प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडीओमध्ये गवा वेगाने शोरूममध्ये घुसताना दिसतो. काचेचे प्रवेशद्वार फोडत तो आत आला; मात्र फरशीवर घसरून थेट काँक्रीटच्या भिंतीवर आदळला. काही क्षण तोल सांभाळल्यानंतर पुन्हा उभे राहत त्याने बाहेरचा रस्ता पकडला. या धावपळीत शोरूममधील काचांचा चुराडा झाला, फर्निचरचे नुकसान झाले आणि नव्या कोऱ्या दुचाकींना मोठमोठे डेंटस्‌‍ पडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शोरूममधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्वजण घाबरून परिसरातून पळून गेले. घटनेनंतर वन विभागाने तातडीने शोधमोहीम सुरू केली असून, संबंधित गवा सापडल्यास गरज पडल्यास बेशुद्ध करून पकडण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news