‘गईया’ दुर्बिणीच्या 11 वर्षांच्या अंतराळ मोहिमेची सांगता

दुर्बिणीच्या निरीक्षणांमुळे 13,000 हून अधिक वैज्ञानिक अभ्यास प्रकाशीत
Gaia telescope
‘गईया’ दुर्बिणीच्या 11 वर्षांच्या अंतराळ मोहिमेची सांगता
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः खगोलशास्त्रज्ञांनी 27 मार्च रोजी ‘गईया’ दुर्बिणीला (Gaia Telescope) निरोप दिला, ज्यामुळे आपल्या आकाशगंगेचे आणि जवळच्या विश्वाचे नकाशे तयार करणार्‍या या क्रांतिकारी मोहिमेचा समारोप झाला. हबल आणि जेम्स वेब यांसारख्या प्रसिद्ध दुर्बिणींइतकी ओळख नसली, तरी ‘गईया’ने आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेच्या अभ्यासात आमूलाग्र बदल घडवून आणले. 2014 पासून युरोपियन अंतराळ संस्था (ESA) संचालित ही दुर्बीण अतिशय बारकाईने विश्वाचा नकाशा तयार करत होती. या मोहिमेंतर्गत 2 अब्ज तारे, 40 लाखांहून अधिक संभाव्य आकाशगंगा आणि सुमारे 1,50,000 लघुग्रह नोंदवले गेले, तसेच त्यांच्याभोवती फिरणार्‍या संभाव्य चंद्रांचाही शोध लागला.

या दुर्बिणीच्या निरीक्षणांमुळे 13,000 हून अधिक वैज्ञानिक अभ्यास प्रकाशीत झाले आणि भविष्यातही याचा मोठा प्रभाव राहील, असे संशोधकांचे मत आहे. ‘गईयाचे विस्तृत डेटा प्रकाशन हे खगोलशास्त्रीय संशोधनासाठी अमूल्य ठेवा आहे आणि ते खगोलशास्त्राच्या सर्व शाखांवर प्रभाव टाकते,’ असे युरोपियन स्पेस अ‍ॅस्ट्रॉनॉमी सेंटर येथील भौतिकशास्त्रज्ञ आणि ‘गईया’ मोहिमेतील प्रकल्प वैज्ञानिक जोहान्स सॅलमन यांनी सांगितले. अपेक्षित कालावधीपेक्षा जवळपास दुप्पट वेळ कार्यरत राहिल्यानंतर, अखेर ‘गईया’चे इंधन संपले आणि ‘ईसा’ ने दुर्बिणीचे यंत्र बंद करून तिला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित झालेली ही दुर्बीण पृथ्वीपासून 16 लाख किलोमीटर (1 दशलक्ष मैल) अंतरावर Lagrange Point 2 ( L2) या स्थानी कार्यरत होती, जिथे पृथ्वी, सूर्य आणि उपग्रहाच्या गतीमुळे निर्माण होणार्‍या गुरुत्वीय शक्ती संतुलित राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news