

न्यूयॉर्क : बदलत्या काळासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे आता केवळ एक तंत्रज्ञान राहिलेले नाही, तर ती एक गरज बनत चालली आहे. दैनंदिन कामांपासून ते ऑफिसच्या गुंतागुंतीच्या कामांपर्यंत, एआय माणसाला मदत करत आहे. आतापर्यंत आपण ‘एआय’ चा वापर लेख लिहिण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी होताना पाहिला असेल. पण, तुम्ही कधी ‘एआय’ ला गाणी लिहिताना आणि गाताना ऐकले आहे का? होय, तुम्ही बरोबर ऐकलं. सध्या एक असा म्युझिक बँड चर्चेत आहे, जो पूर्णपणे ‘एआय’ ने तयार केला आहे आणि लोक त्याचे चाहते झाले आहेत.
आम्ही ज्या बँडबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे ‘वेल्वेट सनडाऊन.’ या बँडला पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केले आहे आणि त्याने डिेींळषू वर दरमहा 10 लाखांहून अधिक श्रोत्यांपर्यंत आपली पोहोच निर्माण केली आहे. पहिल्या नजरेत, ‘वेल्वेट सनडाऊन’ हा एक सामान्य नवीन बँड वाटतो. त्याचे मनमोहक अल्बम कव्हर, गाण्यांची आकर्षक नावे आणि मनाला शांत करणार्या सुमधुर धून, सर्व काही अगदी परिपूर्ण होते. पण, एक गोष्ट अशी समोर आली, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती - या बँडमध्ये एकही खरा संगीतकार नव्हता.
कोणताही लाईव्ह कॉन्सर्ट नाही. तरीही, या बँडला प्रचंड पसंती मिळाली. जेव्हा तुम्ही ‘वेल्वेट सनडाऊन’चे कोणतेही गाणे ऐकता, तेव्हा ते अगदी खरे वाटते. त्यात भावना जाणवतात. गाण्यांचे बोल ओळखीच्या विषयांवर आधारित आहेत आणि भावनांना हात घालतात. संगीत इतके शांत आणि श्रवणीय आहे की तुम्ही ते तुमच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट करू इच्छिणार. हीच गोष्ट थेट हृदयाला स्पर्श करते. मग ते गाणे एखाद्या गायकाने लिहिले आहे की एका प्रशिक्षित ‘एआय’ मॉडेलने, याने काही फरक पडत नाही. तथापि, जेव्हा काही लोकांना ‘वेल्वेट सनडाऊन’ खरा बँड नाही हे कळले, तेव्हा ते नाराजही झाले. पूर्वी चांगले संगीत तयार करणे ही एक अत्यंत महागडी प्रक्रिया होती. यासाठी महागडे सॉफ्टवेअर, वाद्ये, प्रशिक्षण आणि संगीत उद्योगात ओळख असणे आवश्यक होते. पण आता, र्डीपे, णवळे, एश्रर्शींशपङरली आणि उहरींॠझढ सारख्या अख टूल्समुळे कोणताही सामान्य माणूस गाणी, संकल्पना अल्बम किंवा अगदी संपूर्ण डिजिटल बँड तयार करू शकतो.