कोणत्या फळात सर्वाधिक, कोणत्यामध्ये कमी प्रोटिन?

फळांचे सेवन हे आरोग्यासाठी चांगले असते
कोणत्या फळात सर्वाधिक, कोणत्यामध्ये कमी प्रोटिन?
Pudhari File Photo
Published on
Updated on

फळांचे सेवन हे आरोग्यासाठी चांगले असते. काही फळे प्रोटिन म्हणजेच प्रथिनांसाठी उपयुक्त असतात, तर काही फळांमध्ये प्रोटिन्स कमी असतात. तज्ज्ञांनी कोणत्या फळात सर्वाधिक व कोणत्या फळात सर्वात कमी प्रोटिन असते, याबाबतची दिलेली ही माहिती...

कोणत्या फळात असते सर्वाधिक प्रोटिन?

‘सर्वसाधारणपणे खाल्ल्या जाणार्‍या फळांमध्ये पेरू या फळात सर्वात जास्त प्रोटिन असते. शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषक तत्त्वांसह पेरूमध्ये प्रथिनेही चांगल्या प्रमाणात आढळतात. प्रति 100 ग्रॅम पेरूमध्ये अंदाजे 2.6 ते 3 ग्रॅम प्रोटिन असते. तसेच त्यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटस्देखील भरपूर असते, ज्यामुळे पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आहार तज्ज्ञांच्या मते, दररोज अंदाजे 150 ते 200 ग्रॅम एक मध्यम आकाराचा पेरू खाल्ल्याने शरीरास 4 ते 6 ग्रॅम प्रोटिन आणि आवश्यक पोषक घटक मिळू शकतात. यामुळे पेरूचा आहारात समावेश करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषत: ज्यांना नैसर्गिक स्रोतांमधून मिळणारे प्रोटिन, जीवनसत्त्व आणि फायबरचं सेवन करायचं आहे, त्यांच्यासाठी पेरू हे उत्तम फळ आहे.

कोणत्या फळांमध्ये असते कमी प्रोटिन?

टरबूज किंवा कलिंगड ही अशी फळं आहेत, ज्यात सर्वात कमी प्रोटिन असते. प्रति 100 ग्रॅम टरबूजमध्ये फक्त 0.6 ग्रॅम प्रोटिन असते. या फळात भले प्रोटिनचे प्रमाण अधिक नसले तरी ते हायड्रेटिंग आहे, तसेच त्यात जीवनसत्त्वे अ आणि क, पोटॅशियम आणि लाइकोपीनसारखे अँटिऑक्सिडंटस्सारखे महत्त्वाचे पोषक घटक आहेत. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याच्या सेवनाने शरीर हायड्रेट ठेवता येते. विशेषतः उन्हाळ्यात आणि खूप व्यायाम केल्यानंतर टरबूज खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या कमी होते. दररोज एक ते दोन कप म्हणजे अंदाजे 200 ते 300 ग्रॅम टरबूज खाल्ल्याने हायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि अँटिऑक्सिडंट सेवन वाढू शकते; परंतु तुम्हाला यातून प्रोटिन मिळणार नाही. फळांच्या दैनंदिन सेवनामुळे शरीरास आवश्यक प्रोटिन्सची गरज भागवली जाऊ शकत नाही; पण पेरूसारख्या प्रोटिनयुक्त फळाने काही प्रमाणात का होईना, शरीरासाठी आवश्यक प्रोटिनची मात्रा राखता येते. प्रोटिनयुक्त पदार्थ अधिक खाण्याचा विचार करणार्‍यांसाठी आहारतज्ज्ञांनी काही पर्याय सुचवले आहेत. तुम्ही दही, काजू, कडधान्य किंवा शेंगदाण्यासह फळांचे सेवन केल्यास प्रोटिनची कमतरता दूर करता येते.

प्रोटिनयुक्त फळं आणि पोषक तत्त्वांनी युक्त पदार्थांचे एकत्रित सेवन करून तुम्ही स्नायूंचे आरोग्य, चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news