Bicycle Stunt France Cliff | फ्रान्सच्या उंच डोंगराच्या कड्यावर सायकल स्टंट

अनाठायी धाडसावर नेटकऱ्यांची टीका
Bicycle Stunt France Cliff |
Bicycle Stunt France Cliff | फ्रान्सच्या उंच डोंगराच्या कड्यावर सायकल स्टंट
Published on
Updated on

पॅरिस : सोशल मीडियावर रोजच नवनवीन आणि थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण यावेळी जो व्हिडीओ समोर आला आहे, तो पाहून चांगल्या चांगल्या स्टंटबाजांनाही घाम फुटला आहे. फ्रान्सच्या उंच डोंगरांवर एका व्यक्तीने आपल्या सायकलसोबत असा काही जीवघेणा खेळ खेळला आहे, जो पाहून इंटरनेटवरील जनतेचा थरकाप उडाला आहे. ‘चुकीला अजिबात माफी नाही’ (No room for error) अशा कॅप्शनसह शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

आजकाल सोशल मीडियावर रील्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. फ्रान्समध्ये राहणाऱ्या ‘फेलिप वर्गीज’ या सायकलस्वारानेही असंच काहीसं केलं आहे. फेलिप हा एक अत्यंत कुशल सायकलस्वार आहे; पण यावेळी त्याने निवडलेला रस्ता कोणाचेही ठोके चुकवणारा आहे. फ्रान्समधील एका उंच डोंगराळ भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या अत्यंत अरुंद बाऊंड्री वॉलवर (भिंतीवर) त्याने सायकल चालवली. ज्या भिंतीवर फेलिप सायकलचा समतोल (बॅलन्स) सांभाळत होता, त्याच्या अगदी बाजूला हजारो फूट खोल दरी होती. जर एक इंचही बॅलन्स बिघडला असता, तर थेट मृत्यू निश्चित होता. फेलिपने स्वतः हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, चुकीला वाव नाही!

हे अगदी खरंही आहे. कारण, तिथून खाली पडल्यावर वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच अवघ्या काही वेळात व्हायरल झाला. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक फेलिपच्या बॅलन्स आणि कौशल्याचं कौतुक करत आहेत, तर बहुतांश लोकांनी याला अत्यंत मूर्खपणाचे पाऊल म्हटले आहे. ‘फक्त एका व्हिडीओसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे अजिबात शहाणपणाचे नाही,’ असे नेटीझन्सचे म्हणणे आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले, ‘हा स्टंट पूर्णपणे अनावश्यक आणि जीवघेणा आहे.’ तर दुसऱ्या एका यूजरने भीतीयुक्त मजेशीर अंदाजात लिहिले, ‘हे पाहतानाच माझ्या पायाला कंप सुटला आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news