अंटार्क्टिकामध्ये पक्ष्यांच्या सुरुवातीच्या पूर्वजांचे जीवाश्म

6 कोटी 90 लाख वर्षांपूर्वीचे हे जीवाश्म आहे
fossils of early bird ancestors discovered in antarctica
अंटार्क्टिकामध्ये पक्ष्यांच्या सुरुवातीच्या पूर्वजांचे जीवाश्म.Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : संशोधकांनी अंटार्क्टिकामध्ये आधुनिक पक्ष्यांच्या सर्वात जुन्या पूर्वजांपैकी एक असलेल्या बदकासारख्या पक्ष्याचे जीवाश्म शोधले आहे. 6 कोटी 90 लाख वर्षांपूर्वीचे हे जीवाश्म आहे. या शोधामुळे आधुनिक पक्ष्यांच्या उगमाविषयी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडू शकतो. या जीवाश्मामध्ये पक्ष्याची जवळजवळ संपूर्ण अवस्थेत असलेली कवटी आहे.

हा पक्षी ‘वेगाविस ईआई’ या पाणथळ जागी राहत असलेल्या पक्षी प्रजातीमधील आहे. आधुनिक काळातील बदक व हंसांचे हे सर्वात जुने नातेवाईक होते. ज्यावेळी पृथ्वीवर ‘टी-रेक्स’सारखे डायनासोर वावरत होते, त्यावेळी हे पक्षी अस्तित्वात होते. या नव्या संशोधनानुसार क्रेटाशिअस काळाच्या अखेरीस झालेल्या महासंहाराच्या घटनेतून हे पक्षी बचावले असावेत. अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीमधील ज्युलिया क्लार्क या पॅलिओंटोलॉजिस्टने याबाबतचे संशोधन केले आहे. अंटार्क्टिकाच्या वेगा बेटावर त्यांनीच 1992 मध्ये ‘व्ही.ईआई’ प्रजातीच्या पहिल्या जीवाश्माची नोंद केली होती. ते जीवाश्म 6 कोटी 60 लाख ते 6 कोटी 80 लाख वर्षांपूर्वीच्या काळातील होते. त्यांनी त्यावेळीच सांगितले होते की, ही प्रजाती पाण्यावर वावरणार्‍या आधुनिक पक्ष्यांशी निगडीत आहे. आता या पक्ष्याच्या कवटीच्या शोधामुळे त्याला पुष्टीच मिळालेली आहे. ओहिओ युनिव्हर्सिटीतील पॅट्रिक ओ’कोन्नोर यांनी सांगितले की, आधीच्या जीवाश्मामध्ये केवळ सांगाड्याचे काही भागच होते. पक्ष्यांबाबत त्याची कवटीच अधिक माहिती देणारी असते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे पक्षी लांब व निमुळत्या चोचीचे होते. त्यांच्या जबड्याचे स्नायू मजबूत होते आणि आधुनिक पक्ष्यांप्रमाणेच ते चपळाईने मासे पकडत असत. त्यांची शरीर रचना सध्याच्या बदक किंवा हंसांप्रमाणेच होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news