Food Delivery Robot | अमेरिकेत आला फूड डिलिव्हरी करणारा रोबो

स्वायत्त वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ‘डॉट’ हा डोरडॅशचा पहिला स्वतंत्र प्रयत्न
food delivery robot launched in america
Food Delivery Robot | अमेरिकेत आला फूड डिलिव्हरी करणारा रोबोPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रमुख फूड डिलिव्हरी कंपनी डोरडॅशने आपला नवीन ऑटोनॉमस डिलिव्हरी रोबो ‘डॉट’ सादर केला आहे. स्वायत्त वाहन तंत्रज्ञानाच्या (Autonomous Vehicle Technology) क्षेत्रात ‘डॉट’ हा डोरडॅशचा पहिला स्वतंत्र प्रयत्न आहे. यापूर्वी कंपनीने ड्रोन डिलिव्हरीची चाचणी केली होती आणि ‘कोको रोबोटिक्स’सोबत फूटपाथ डिलिव्हरीसाठी सहयोग केला होता.

डोरडॅशचे सह-संस्थापक स्टॅनली टँग म्हणाले, ‘आमच्या व्यवसायाची गुंतागुंत आणि व्याप्ती पाहता, स्वायत्तता सारख्या तंत्रज्ञानाची गरज होती. ‘डॉट’ हे यासाठी उत्कृष्ट समाधान आहे.’ या रोबोचा वेग ताशी 20 मैलांपर्यंत (24 किमी प्रति तास) आहे. तो एकावेळी 6 पिझ्झा बॉक्स किंवा 30 पौंड (सुमारे 13.6 किलो) पर्यंतचे सामान नेऊ शकतो. यामध्ये 8 कॅमेरे आणि 3 लाइडार सेन्सर (LiDAR Sensors) बसवलेले आहेत. यामध्ये इंटर्नल कॅमेरे आहेत, जे अन्न सुरक्षित आणि योग्य स्थितीत पोहोचले याची खात्री करतात.

यामधील ‘स्मार्ट स्केल’ हे फीचर ऑर्डरचे वजन करते आणि काही कमतरता असल्यास त्वरित ओळखते. डोरडॅशने सांगितले की, ‘डॉट’ची चाचणी फीनिक्स शहरात सुरू आहे आणि भविष्यात तो इतर प्रमुख महानगरांमध्येही लागू केला जाईल. कंपनीने ऑटोनॉमस डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ड्रोन डिलिव्हरीचाही समावेश असेल. कंपनीच्या मते, चाचणीदरम्यान स्मार्ट स्केल फीचरमुळे ऑर्डरमध्ये वस्तू कमी असल्याच्या तक्रारी 30% पर्यंत कमी झाल्या आहेत.

‘डॉट’ रोबोचा उद्देश केवळ डिलिव्हरी प्रक्रिया जलद आणि सुरक्षित करणे नाही, तर स्थानिक व्यापार्‍यांनाही या तंत्रज्ञानाशी जोडणे आहे. ‘डॉट’च्या लाँचमुळे डोरडॅश आता ऑटोनॉमस फूड डिलिव्हरीच्या वाढत्या ट्रेंडमध्ये सामील झाली आहे. ऊबर (Uber) आणि इतर कंपन्या देखील ड्रोन आणि सेल्फ-ड्रायव्हिंग कारद्वारे डिलिव्हरी सेवांमध्ये गुंतवणूक करत आहेत. यातून, भविष्यात अन्न वितरणामध्ये रोबोटिक्सचे महत्त्व वाढत असल्याचे स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news