Brain Health food | डिमेंशियापासून बचाव करतो फ्लेवोनॉईडस्ने समृद्ध आहार

flavonoid rich diet prevents dementia
Brain Health food | डिमेंशियापासून बचाव करतो फ्लेवोनॉईडस्ने समृद्ध आहारPudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : डिमेंशियासारख्या गंभीर मेंदूच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आता औषधांपेक्षा तुमचा आहार अधिक प्रभावी ठरू शकतो. याबाबत अनेक संशोधने झाली आहेत. या संशोधनांमध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात फ्लेवोनॉईडस्ने समृद्ध पदार्थांची 6 अतिरिक्त सर्व्हिंग्स समाविष्ट केली, तर डिमेंशियाचा धोका 28 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, फ्लेवोनॉईडस् हे नैसर्गिक घटक आहेत, जे फळे, भाज्या, चहा आणि डार्क चॉकलेटसारख्या खाद्यपदार्थांमध्ये आढळतात. त्यांचा संबंध मेंदूचे चांगले आरोग्य, सूज कमी करणे आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याशी जोडला गेला आहे. संशोधनानुसार, ज्यांना उच्च रक्तदाब, नैराश्य किंवा आनुवंशिक कारणांमुळे डिमेंशियाचा धोका आहे, अशा लोकांसाठी फ्लेवोनॉईडस्ने समृद्ध आहार अधिक फायदेशीर ठरतो.

‘द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, आतड्यातील जिवाणू आणि फ्लेवोनॉईडस्ने भरपूर असलेले खाद्यपदार्थ उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. असे यासाठी होते, कारण जेव्हा आपण या पदार्थांचे सेवन करतो, तेव्हा आतड्यात असलेले जीवाणू त्यांना तोडण्यास मदत करतात. हा अभ्यास दर्शवतो की, योग्य पोषण केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यही सुधारू शकते. असे काही फळे आणि खाद्यपदार्थ आहेत, ज्यांना रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास समस्या कमी होऊ शकतात.

यामध्ये सफरचंद, संत्रा, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या, ग्रीन टी किंवा ब्लॅक टी, डार्क चॉकलेट, लिंबूवर्गीय फळे आणि द्राक्षे यांचा समावेश आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, फ्लेवोनॉईडस् मेंदूमधील कॉग्निटिव्ह फंक्शन्स सुधारण्यास मदत करू शकतात आणि वाढत्या वयानुसार होणारी मानसिक घसरण (mental decline) कमी करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news