

लंडन : इंग्लंडमधील नॉर्मन क्रॉस कॅम्पला जगातील पहिली युद्धकैदी छावणी मानले जाते. आता सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. नेपोलियन युद्धादरम्यान ही छावणी 1796 साली बांधण्यात आली होती आणि येथे सुमारे 7,000 फ्रेंच कैद्यांना ठेवण्यात आले होते. नेन पार्क ट्रस्टने यंदा हा ऐतिहासिक ठिकाण विकत घेतले असून, माहितीफलक, व्हिडीओ आणि डिजिटल साधनांच्या मदतीने या छावणीचे इतिहास पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात उद्घाटन सोहळा झाला.
नेपोलियन युद्धावेळी ही छावणी एका छोट्या शहराप्रमाणे विकसित केली होती. येथे सैनिकांसाठी बॅरॅक्स, रुग्णालय, शाळा, बाजारपेठ आणि बँकिंग सुविधा होत्या. समुद्रापासून आणि आक्रमणाच्या मार्गांपासून दूर असल्याने येथून कैद्यांना पळून जाणे किंवा फ्रान्सला परत जाणे कठीण होते.
अंदाजे 2,000 हून अधिक माजी सैनिक येथे दफन आहेत, त्यामध्ये फ्रेंच, बेल्जियन आणि ब्रिटिश जवानांचा समावेश आहे. या ठिकाणाचे पुनरुज्जीवन नॅशनल लॉटरी हेरिटेज फंड व हिस्टॉरिक इंग्लंड यांच्या साहाय्याने करण्यात आले आहे. नेन पार्क ट्रस्टने भविष्यात याविषयी ऑनलाइन माहिती उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.