First CCTV camera history | चोरी पकडण्यासाठी बनला नव्हता पहिला ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा!

First CCTV camera history |
First CCTV camera history | चोरी पकडण्यासाठी बनला नव्हता पहिला ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा!
Published on
Updated on

नवी दिल्ली : आजच्या काळात सुरक्षिततेसाठी प्रत्येक कोपर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेरे दिसतात; पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जगातील पहिला सीसीटीव्ही कॅमेरा केव्हा आणि का बनवण्यात आला होता? याचा इतिहास अत्यंत रंजक असून, तो 1942 च्या दुसर्‍या महायुद्धाशी जोडलेला आहे.

जगातील पहिली सीसीटीव्ही प्रणाली जर्मनीच्या ‘पीनेमुंडे’ या लष्करी तळावर बसवण्यात आली होती. या तंत्रज्ञानाचे श्रेय प्रसिद्ध जर्मन अभियंता वॉल्टर बर्च यांना जाते, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प साकारला गेला. त्या काळात जर्मनी आपल्या ‘त-2’ रॉकेटची चाचणी करत होता. हे जगातील पहिले लांब पल्ल्याचे ‘गायडेड बॅलिस्टिक क्षेपणास्त्र’ होते. या रॉकेटच्या चाचणीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अचानक मोठा स्फोट होण्याचा धोका सतत असायचा. त्यामुळे शास्त्रज्ञांना अशा एका यंत्रणेची गरज होती, ज्याद्वारे ते सुरक्षित अंतरावर बसून रॉकेट लाँचिंगवर लक्ष ठेवू शकतील. शास्त्रज्ञांची हीच गरज लक्षात घेऊन कॅमेरा आणि मॉनिटरवर आधारित एक विशेष प्रणाली विकसित करण्यात आली.

अभियंता वॉल्टर बर्च यांनी अतिशय हुशारीने हे कॅमेरे लाँच पॅडच्या ‘ब्लास्ट झोन’जवळ एका मजबूत स्टील आणि काँक्रिटच्या सुरक्षा कवचात बसवले. सुरक्षा कवचात बसवलेले हे कॅमेरे केबलच्या माध्यमातून लांब अंतरावर असलेल्या एका सुरक्षित बंकरशी जोडलेले होते. यामुळे शास्त्रज्ञांना सुरक्षित ठिकाणी बसून रॉकेटच्या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण पाहणे शक्य झाले. ही संपूर्ण यंत्रणा तारांच्या माध्यमातून एका ‘बंद नेटवर्क’वर (Closed Network) काम करत होती, म्हणून याला ‘क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन’ (Closed Circuit Television - CCTV) असे नाव देण्यात आले. या महान शोधामुळे शास्त्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात न घालता रॉकेट लाँचचे सुरक्षितपणे विश्लेषण करू शकले. आता ‘सीसीटीव्ही’चा वापर बहुतांशी सार्वजनिक व खासगी ठिकाणी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news