with out skeleten body | पृथ्वीवरील पहिल्या प्राण्यांना सांगाडाच नव्हता!

संशोधनाने बदलला जीवसृष्टीचा इतिहास
with out skeleten body |
with out skeleten body | पृथ्वीवरील पहिल्या प्राण्यांना सांगाडाच नव्हता!
Published on
Updated on

ब्रिस्टल : पृथ्वीवरील प्राण्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास नव्याने लिहिण्याची वेळ आली आहे. स्पंज हे पृथ्वीवरील सर्वात जुने प्राणी मानले जातात; परंतु त्यांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल शास्त्रज्ञांमध्ये नेहमीच मतभेद होते. आता ब्रिस्टल विद्यापीठाच्या एका ताज्या संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, पृथ्वीवरील पहिले स्पंज हे मऊ शरीराचे होते आणि त्यांना कोणताही कडक सांगाडा नव्हता.

शास्त्रज्ञांना बर्‍याच काळापासून हा प्रश्न पडला होता की, जर स्पंज 65 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले होते, तर त्यांचे जीवाश्म (फॉसिल्स) केवळ 54 कोटी वर्षांपूर्वीच्या खडकांमध्येच का सापडतात? पण आता या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. सुरुवातीच्या स्पंजना कडक सांगाडा नसल्यामुळे त्यांचे अवशेष जतन झाले नाहीत. आधुनिक स्पंजमध्ये काचेसारखे सूक्ष्म स्पिक्युल्स असतात जे सांगाड्याचे काम करतात. संशोधनानुसार, हे सांगाडे वेगवेगळ्या स्पंज प्रजातींमध्ये स्वतंत्रपणे विकसित झाले आहेत.

डॉ. एम. एलिओनोरा रॉसी आणि त्यांच्या टीमने 133 जनुकांचे विश्लेषण केले आणि मार्कोव्ह प्रोसेस (एआय आणि हवामान अंदाजात वापरले जाणारे मॉडेल) या संगणकीय मॉडेलचा वापर करून हा निष्कर्ष काढला आहे.

या शोधाचे महत्त्व : 1. मानवी उत्क्रांतीशी संबंध : स्पंज हे जगातील पहिले रीफ बिल्डिंग म्हणजेच प्रवाळ भित्तींसारखी रचना निर्माण करणारे प्राणी आहेत. त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास केल्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी नेमकी कशी सुरू झाली, हे समजण्यास मदत होईल. 2. नवीन प्रश्न : जर सुरुवातीच्या स्पंजना सांगाडा नव्हता, तर त्यांच्या सुरुवातीच्या विकासाला नेमकी कशामुळे चालना मिळाली? हे रहस्य उलगडणे अद्याप बाकी आहे. प्रा. डेव्हिड पिसानी यांनी हा शोध केवळ स्पंजबद्दल नाही, तर तो आपल्या ग्रहाच्या आणि जीवसृष्टीच्या सह-उत्क्रांतीबद्दल आहे. यामुळे मानवासह सर्वच प्राण्यांच्या उदयाचा रस्ता कसा तयार झाला, हे समजते, असे मत मांडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news