Female organ 3D imaging | स्त्री शरीरातील सर्वात दुर्लक्षित अवयवाचे पहिले 3-डी चित्रण

Female organ 3D imaging
Female organ 3D imaging | स्त्री शरीरातील सर्वात दुर्लक्षित अवयवाचे पहिले 3-डी चित्रणVanessa A Jewell
Published on
Updated on

अ‍ॅमस्टरडॅम : मानवी शरीरातील सर्वात कमी अभ्यासल्या गेलेल्या अवयवांपैकी एक असलेल्या ‘क्लिटोरिस’ (Clitoris) बाबत नवीन आणि अत्यंत सविस्तर संशोधन समोर आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधकांनी प्रथमच या अवयवाच्या मज्जासंस्थेचे (Nerves) त्रिमितीय (3-D) आणि सूक्ष्मस्तरावरील चित्रण करण्यात यश मिळवले आहे.

16 व्या शतकातील शरीरशास्त्रज्ञांनी या अवयवाचा उल्लेख ‘लज्जास्पद भाग’ असा केला होता. सामाजिक अढी आणि क्लिष्ट शरीररचना यामुळे ऐतिहासिकद़ृष्ट्या यावर फारसे संशोधन झाले नव्हते. मात्र, ‘अ‍ॅमस्टरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर्स’मधील डॉ. जू यंग ली आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘सिंक्रोट्रॉन’ (Synchrotron) नावाच्या अत्यंत प्रखर क्ष-किरण स्रोताचा वापर करून हे संशोधन पूर्ण केले आहे. हे संशोधन ‘ह्युमन ऑर्गन अ‍ॅटलास’ उपक्रमाचा भाग असून, याद्वारे मानवी अवयवांची अत्यंत तपशीलवार माहिती जगासमोर आणली जात आहे.

आतापर्यंत असे मानले जात होते की, या अवयवाची मुख्य संवेदी मज्जातंतू (Dorsal Nerve of the Clitoris - DNC) बाह्य भागाकडे येताना निमुळती होत जाते. मात्र, नवीन 3-डी इमेजेसनी हा समज खोटा ठरवला आहे. संशोधनात असे दिसून आले की, ही मज्जातंतू बाह्य भागामध्ये (Glans) पोहोचताच अनेक उपशाखांमध्ये विभागली जाते आणि तिचे एक भक्कम जाळे तयार होते. या मज्जातंतू केवळ एका भागापुरत्या मर्यादित नसून, त्या ‘मॉन्स प्युबिस’ आणि ‘क्लिटोरल हूड’पर्यंत पसरलेल्या असतात.

या संशोधनाचा सर्वात मोठा उपयोग शस्त्रक्रियांमध्ये होऊ शकतो. विशेषतः, ज्या मुली किंवा महिलांना ‘स्त्री जननेंद्रिय विकृती’ (Female Genital Mutilation) सारख्या अमानवीय प्रथेला सामोरे जावे लागले आहे, त्यांच्यावर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया (Reconstructive Surgery) करताना या नकाशाचा मोठा फायदा होईल. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही प्रथा मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या नवीन संशोधनामुळे अशा पीडित महिलांच्या शारीरिक संवेदना आणि कार्यक्षमता परत मिळवून देण्यासाठी डॉक्टरांना अधिक अचूक मदत मिळेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news