Ferrari Supercar India Launch | ‘फेरारी’ने भारतात लाँच केली तब्बल 10.37 कोटी रुपयांची सुपरकार!

अवघ्या 2.3 सेकंदांत गाठणार 100 कि.मी.चा वेग!
Ferrari Supercar India Launch |
Ferrari Supercar India Launch | ‘फेरारी’ने भारतात लाँच केली तब्बल 10.37 कोटी रुपयांची सुपरकार!
Published on
Updated on

मुंबई/नवी दिल्ली : इटालियन लक्झरी कार निर्माता कंपनी ‘फेरारी’ने भारतात आपली पहिली नॅशनल प्रीमियर इव्हेंट आयोजित करत ‘849 टेस्टारोसा’ (849 Testarossa) ही सुपरकार लाँच केली आहे. मुंबईतील बीकेसी (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या कारचे दिमाखदार अनावरण करण्यात आले. भारतात फेरारीच्या ताफ्यातील ही सर्वात महागडी कार असून, तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 10.37 कोटी रुपये आहे. ही नवीन कार ‘SF90 स्ट्राडेल’ (SF90 Stradale) ची जागा घेईल.

ही कार एक ‘प्लग-इन हायब्रीड’ सुपर स्पोर्टस् बर्लिनेटा आहे. यात मिड-रिअर ट्विन-टर्बो V8 इंजिनसह तीन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. इंजिन आणि मोटर्स मिळून 1050 CV ची शक्ती निर्माण करतात. ही कार अवघ्या 2.3 सेकंदांत 0 ते 100 कि.मी. प्रति तास आणि 6.35 सेकंदांत 200 कि.मी. प्रति तास वेग गाठू शकते. यात अत्याधुनिक एअरोडायनामिक्स, ट्विन-टेल रिअर डिझाईन आणि अ‍ॅक्टिव्ह रिअर स्पॉयलरचा वापर करण्यात आला आहे.

कार्यक्रमादरम्यान फेरारीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनेडेटो विग्ना म्हणाले, ‘भारत हा संधींनी भरलेला देश आहे. येथील तरुणांमधील उद्योजकता आणि ऊर्जा फेरारीच्या नावीन्यपूर्ण तत्त्वांशी सुसंगत आहे.’ कंपनीच्या मते, फेरारीचे भारतीय ग्राहक जागतिक स्तरावर सर्वात तरुण आहेत. येथील ग्राहकांना मोटरस्पोर्ट संस्कृती आणि हाय-परफॉर्मन्स गाड्यांमध्ये विशेष रस आहे. सध्या फेरारीची मुंबई आणि नवी दिल्ली येथे रिटेल विक्री केंद्रे आहेत, तर बंगळूरमध्ये विशेष सर्व्हिस सेंटर कार्यरत आहे. याद्वारे भारतीय ग्राहकांना विक्री आणि तांत्रिक सेवा पुरवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news