Burger Business | वडिलांनी सांगितले ‘बर्गर विक’ आणि उभे राहिले साम्राज्य!

Burger Business |
Burger Business | वडिलांनी सांगितले ‘बर्गर विक’ आणि उभे राहिले साम्राज्य!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : सहसा कोणतेही आई-वडील मुलाला शिक्षणाच्या वयात केवळ शिक्षणच घे, पदवी घेतल्यावर हवे ते कर, असा सल्ला देत असतात. त्यामध्ये फारसे चुकीचे काही आहे असेही नाही; पण काहीजण चाकोरीबाहेरचा मार्गही पत्करतात. तुम्ही कधी अशा वडिलांबद्दल ऐकलं आहे का, की ज्यांनी आपल्या मुलाला म्हटलं, एक तर अभ्यास कर नाहीतर माझ्याकडून पैसे घेऊन बर्गर विक... अमेरिकेतल्या एका वडिलांच्या याच अटीमुळे आज त्यांचा मुलगा ३२ हजार कोटींच्या साम्राज्याचा मालक बनला आहे.

ही कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध फास्ट कॅज्युअल बर्गर चेन फाइव्ह गाइज आणि त्याच्या संस्थापकांच्या कुटुंबाची आहे. आज या ब्रँडचा केवळ अमेरिकेतच नाही तर चीनसारख्या जगातील सर्वात मोठ्या मार्केटमध्ये दबदबा आहे. १९८६ साली अमेरिकेच्या वर्जिनियामध्ये राहणारे जेरी आणि जेनी मुरेल यांनी आपल्या मुलासमोर एक प्रस्ताव ठेवला... तुझ्या कॉलेजसाठी आम्ही जे पैसे जमा केले आहेत, त्यातून एकतर कॉलेजमध्ये जा किंवा स्वत:चा बिझनेस सुरू कर. मुलाने बिझनेसची निवड केली. त्याच पैशातून कुटुंबाने एक टेकआऊट बर्गरचं दुकान उघडलं.

जेरी मुरेलने आपल्या आईची शिकवण कायम लक्षात ठेवली. जर तू लोकांना एक चांगली गुणवत्ता असलेला हॅमबर्गर खाऊ घालू शकतो, तर तू अमेरिकेत कायम पैसे कमावशील. त्याने आपल्या मेन्यूमध्ये फक्त बर्गर आणि फ्राईज ठेवले होते; पण गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. वर्षानुवर्षे स्वत:चं रेस्टॉरंट चालविल्यानंतर २००३ मध्ये जेरी आणि जेनीने आपल्या पाच मुलांसह फ्रेंचाइजीचं वितरण सुरू केलं. त्यांचं बर्गर इतकं प्रसिद्ध झालं होतं की, अवघ्या १८ महिन्यांच्या आत ३०० हून अधिक फ्रेंचाइजी विकली गेली. आज फाइव्ह गाइज जगभरातील २९ देशांत १,९०० हून अधिक रेस्टॉरंट चालवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news