न्यूयॉर्क ः एखाद्या व्यक्तीने आपल्या मनात काय आहे हे अचूक ओळखले तर त्याला आपण 'मनकवडा' म्हणतो. आता 'फेसबुक'ने असेच 'मनकवडे' टूल बनवण्याची तयारी केली आहे. हे टूल एखाद्याचा मेंदू 'वाचू' शकेल!
'फेसबुक'ने नुकतेच आपल्या कर्मचार्यांना एका 'एआय' म्हणजेच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (कृत्रिम बुद्धीमत्ता) टूलची माहिती दिली. कंपनीचे म्हणणे आहे की हे टूल एखाद्या मोठ्या लेखाला बुलेट पॉईंटस्मध्ये विभाजित करील. त्यामधून यूजरला संपूर्ण लेख वाचण्याची गरज राहणार नाही. या टूलचे सेन्सर मानवी मेंदूचे वाचन करण्यासही सक्षम असेल. फेसबुकने आपल्या हजारो कर्मचार्यांसाठी हे टूल ब—ॉडकास्ट केले आहे. 'टीडीएलआर' नावाचे हे टूल असून ते न्यूज आर्टिकलचा सारांश सादर करते. याबाबतची घोषणा कंपनीने मार्चमध्येच केली होती. त्यावेळी फेसबुकने 'न्यूरल इंटरफेस स्टार्टअप लॅब्स'चे अधिग्रहण केले होते. त्या अंतर्गतच कंपनी ब—ेन रीडिंगच्या प्रकल्पावर काम करीत आहे. 'टीडीएलआर' म्हणजे 'टू लाँग डिडन्ट रीड'. हे टूल मोठमोठ्या लेखांना बुलेट पॉईंटस्च्या रूपात तोडून ते सुलभ बनवेल.