चेहरा ओळखून काम करणारे एटीएम मशिन

चीनच्या संशोधकांनी हे यंत्र तयार केले
Face Recognition System for ATM Security
चेहरा पाहून माणसाची ओळख पटवणारे एटीएम यंत्र तयार केले.Pudhari File Photo
Published on
Updated on

बीजिंग : बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी एटीएम मशिनचा वापर आता सर्वसामान्य बनलेला आहे. जगात पाण्यापासून सोन्यापर्यंत अनेक वस्तू मिळवण्याचेही असे मशिन्स आहेत. मात्र, बँकेच्या व्यवहारासाठी मनुष्याची ओळख पटवणे हे गरजेचे असते. चीनच्या संशोधकांनी प्रथमच चेहरा पाहून माणसाची ओळख पटवणारे एटीएम यंत्र तयार केले आहे. त्यामुळे एटीएम यंत्रांवर दरोडे पडण्याची जोखीम कमी होईल. तिंगशुआ विद्यापीठ व हांगझाऊची झेकवान टेक्नॉलॉजी कंपनी यांनी हे यंत्र तयार केले आहे. त्यात आर्थिक व्यवहारांना संरक्षण मिळाले आहे असे साऊथ चायना मॉर्निग पोस्ट या वृत्तपत्राने म्हटले आहे.

केक आहे की एटीएम मशिन?

नवीन यंत्रे नोटा अधिक वेगाने हाताळू शकतात

झेकवानचे अध्यक्ष ग्यू झिकून यांनी सांगितले की, या नव्या एटीएममुळे आर्थिक गुन्हे कमी होतील. चीनमध्ये सध्या आयात केलेले एटीएम तंत्रज्ञान वापरले जाते; पण नवीन यंत्रे नोटा अधिक वेगाने हाताळू शकतात, खोट्या नोटा ओळखू शकतात व पैसे काढायला आलेल्याचा चेहरा ओळखू शकतात. हे तंत्रज्ञान संपूर्ण चिनी आहे. ग्यू यांच्या या उत्पादनास अधिकार्‍यांनी प्रमाणित केले आहे. चिली व कोलंबिया या देशांमध्ये बोटांचे ठसे ओळखणारी एटीएम यंत्रे आहेत. काही देशात बायोमेट्रिक यंत्रे वापरली जात नाहीत. त्यात अमेरिकेचा समावेश आहे, कारण त्यात व्यक्तिगतता राहत नाही. चीनची नवीन एटीएम यंत्रे देशातील बँकांना व सुरक्षा यंत्रणांना जोडली जाऊ शकतील. त्यामुळे ज्याच्याकडे डेबिट कार्ड असेल, तोच पैसे काढू शकेल. जरी दुसर्‍याला पासवर्ड माहिती असला तरी त्याला पैसे काढता येणार नाहीत. या तंत्रज्ञानाच्या विरोधकांनी व्यक्तिगततेचा मुद्दा उपस्थित केला असून, ऑनलाईन अचूकतेवर शंका घेतल्या आहेत. जर कुणाची प्लास्टिक सर्जरी झाली असेल तर चेहरा कसा ओळखणार? कारण, एखादी व्यक्ती तिचा चेहरा अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्यासारखाही करू शकतो. अर्थात, चिन्यांच्या अजब देशात काहीही घडू शकत असल्याने अशा शंका रास्तच आहेत.

‘टाईम मशिन’ची संकल्पना होईल साकार?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news